मासिक पाळी स्रीला लाभलेले नवनिर्मितीचे वरदान आहे. डॉ.संगीता महाजन यांचे बोदवड महाविद्यालयत मुलीचे वसतिगृह व विकास समितीतर्फे आयोजित राज्यस्तरीय वेबिनारमध्ये प्रतिपादन...


वरणगाव प्रतिनिधी- सुनील पाचपोळ.

कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड येथे मुलींचे वसतिगृह व परिसर समिती आयोजित," मासिक पाळी समस्या व घ्यावयाची काळजी" या विषयावर आयोजित  या कार्यक्रमाचे  उद्घाटन  महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी सर यांनी केले. यावेळेला सरांनी उद्घाटनपर मार्गदर्शनामध्ये  सांगितले  की, महिला आणि मुली आपल्या समस्या बोलत नाहीत,सतत दुखणे अंगावर काढतात. त्याचा परिणाम असा होतो की, अंगावर दुखणे बळावत जाते.आणि उघडपणाने महिला आजही समाजातील या मासिक पाळी विषयी चर्चा करत नाही. ते सांगणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन सरांनी यावेळी केले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ. संगीता महाजन यांनी "मासिक पाळी अंधश्रद्धा व वैज्ञानिक दृष्टिकोन" या विषयासंबंधी पीपीटी द्वारे अतिशय शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले  की, मासिक पाळी या प्रक्रियेला आपण गर्भाशयातले अश्रू देखील म्हणू शकतो. त्याला  गर्भाचं अस्तर असतं आणि म्हणून त्याला अशुद्ध रक्त  म्हणू नये. मुलींच्या शरीरात रक्त हे अशुद्ध नसतेच. हे आधी समाजाने समजून घेतले पाहिजे.पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.स्रीला निसर्गाची लाभलेली ही अनमोल देणगी आहे. व नवनिर्मितीचे वरदान लाभलं आहे. याचा आदर समाजातील  प्रत्येकाने केलाच पाहिजे. मासिक पाळी विषयी आजही सर्वत्र बोलणे टाळत राहतात. आपण या विषयावर आपलेपणाने बोलत नाही.या संबंधातील समाजाची  मानसिकता बदलणे अतिशय गरजेचे आहे. गांभीर्यपूर्णपणे  या विषयाकडे आज आपण  बघितलं पाहिजे.आपल्या शरीरात होणारे बदल ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. स्त्रीला टाळण्यासाठी किंवा दुय्यम स्थान देण्यासाठी समाजाने ही धारणा निर्माण केलेली  आहे. आणि त्यातच समाज गुरफटून गेलेला आहे.त्याला वेगळ्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे. समाजात आजही अंधश्रद्धा आणि गैरसमज मोठ्या प्रमाणात आहेत. असे प्रतिपादन यावेळी डॉ.संगीता महाजन यांनी केले.यावेळी बऱ्याच विद्यार्थिनींनी प्रश्न विचारले व त्याचे निराकरण ही मॅडमनी यावेळी केले.दुसरे वक्ते डॉ.रूपाली तायडे यांनी ग्रामीण व शहरी महाविद्यालयातील विद्यार्थिनी व महिला त्यांच्या समस्या व घ्यावयाची काळजी या विषयावर त्यांनी पीपीटी च्या माध्यमातून वैज्ञानिक पद्धतीने व शास्त्रशुद्ध पद्धतीने माहिती दिली यावेळी मॅडम यांनी सांगितले की,मासिक पाळी मध्ये पॅड किंवा कपडा यांचा वापर न करता आज उपलब्ध असलेल्या आधुनिक साधनांचा उपयोग आपण कशा पद्धतीने करू शकतो. तसेच त्यांचा वापर आपण कोणत्या पद्धतीने करावा. अंगावर जर जास्त रक्त जात असेल  त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.जास्त पोट दुखत असल्यामुळे ओरोमा थेरपीचा वापरही करावा,तसेच या पाच दिवसात हलका आहार घ्यावा व थोडासा व्यायामही केल्यास आपल्याला बरे वाटते,वेलची,मोरवळा,बेलाचा काढा गरजेनुसार घेतल्यास आपल्याला बरे वाटेल. मासिक पाळीचे चक्र कसे असते हे यावेळी समजावून सांगितले.मासिक पाळीच्या दरम्यान अंतर्वस्र नियमित बदलणे गरजेचे आहे.तसेच अंतरभागाची स्वच्छता सुद्धा या कालावधीत करणे गरजेचे आहे. हे मॅडमने सांगितले.यावेळी  कार्यक्रमाची प्रस्तावना या चर्चासत्र समन्वयक व मुलींचे वसतिगृह व विकास परिसर समिती अध्यक्ष डॉ.रत्ना जवरास यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व भूमिका मांडताना  सांगितले की,आज मासिक पाळी हा विषय समस्या म्हणून मनात न ठेवता अधिक खुलेपणाने मुलींनी पालकांशी बोलायला पाहिजे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्या आहारात बदल करणे गरजेचे आहे.मुलींनी अधिक उघडपणे  या विषयावर बोलायला पाहिजे. यासाठी हा विषय बोदवड महाविद्यालयाने चर्चासत्रासाठी निवडलेला आहे.हीच या चर्चासत्रामागची प्रमुख भूमिका यावेळी डॉ.रत्ना जवरास यांनी मांडली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गीता पाटील यांनी केले,तर आभार प्रदर्शन श्रीमती कंचन दाभाडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक आरविंद चौधरी  सर उपप्राचार्य  डॉ.व्हि.पी चौधरी, मुलींचे वसतिगृह व परिसर समिती प्रमुख,चर्चासत्राचे आयोजन व समन्वयक डॉ.रत्ना जवरास,सदस्य डॉ.गीता पाटील, श्रीमती कांचन दाभाडे, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बोदवड येथील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

Previous Post Next Post