स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांना गोपनीय माहिती मिळाली की सेंटॅक्स च्या पाण्याच्या टाकीतून चोरटी वाहतूक सुरू आहे तसेच दिनांक 22 जानेवारी रोजी मेहकर ते चिखली रोड वर पाण्याच्या टाकीतून गुटख्याची वाहतूक करणार आहे अशा गुप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांनी माहितीप्रमाणे मालखेड फाट्या जवळ सापळा रचला असता या गुन्ह्यातील आरोपी जावेद खान जमीर खान वय 24 राहणार इंदिरानगर डोणगाव तालुका मेहकर खात्रीलायक माहिती प्रमाणे दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान चोरटी गुटख्याची वाहतूक मेहकर ते चिखली रोडवर पांढऱ्या रंगाच्या सिंटेक्स टाकी मधून करीत असताना आढळला असता आरोपी जवळून 1. विमल एकच तंबाखू चे सुगंधित प्रत्येकी अकरा पाऊच असलेले 40 पुढे किमती प्रतिकिमती प्रति पुडा 22 रु या प्रमाणे880 रूचा माल 2. विमल केसर संयुक्त पान मसाला तीन पाउचचेनिस पॉकेट किमती 54 प्रमाणे1080रु 3.केसर युक्त विमल पान मसाला एका पाउच मध्ये 11 पाउचचे 40 नग कि 188रु प्रमाणे7920 ,4. केसर युक्त विमल पान मसाला 65 नग कि 150रु प्रमाणे9750रु,5. वाह पान मसाला 30 पाऊचचे 128 पाकीट प्रत्येकी120 रु प्रमाणे 15360 रु चा माल 6. विमल 1 तंबाखू 3 पाऊचचे 20 पाकीट प्रत्येकी 6रु प्रमाणे120रु,7. विमल 1 तंबाखू 60पाऊचचे 65पाकीट प्रत्येकीकि 30 रु प्रमाणे 1950 रु 8. डब्ल्यू ची विंग तंबाखु 30पाऊचचे 128पाकेट कि 15रुप्रमाणे1920रु 9. एक काळ्या रंगाची बजाज पल्सर मोसा जुनी वापरती कि 65000रु. एक पांढर्या रंगाची सिंटेक्स प्लेस्टो कंप टाकी कि 1800रु, रेडमी कंपनी मोबाइल किमत 10000रु असा एकूण मुद्देमाल किंमत 1,15,780 चा मिळून आल्याने लेखी रिपोर्ट वरून सदरचा अप साखरखेर्डा पोलीस स्टेशनला दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे हे करत आहे. सदर आरोपी वर कलम 188,272,328 भा.द.वि.सह कलम 26(2),26(2), (i), (v),27(e),30(2)(a) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई श्री अरविंद चावरिया पोलीस अधीक्षक बुलढाणा, बजरंग बनसोडे अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा, बळीराम गीते पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक विलास सानप,पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके पोलीस अंमलदार दिनेश बकाले,अजिस परसुवाले,मधुकर रगड यांनी केली.
पाण्याच्या टाकीतून चोरटी गुटख्याची वाहतूक करताना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आरोपी जवळून एक लाख 15 हजार 780 चा मुद्देमाल केला जप्त...
बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.