मला विचारुन केला का लफडा?खासदार राणांची आॅडिओ क्लिप व्हायरल...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी

अमरावती लोकसभा मतदार संघाच्या खासदार नवनीत राणा या नेहमीच चर्चेत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद शमत नाही तोच पिडितेला उद्धट वागणूक दिल्याची वादग्रस्त आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खासदार राणा पुन्हा चर्चत आल्या आहेत. युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांने फसवणूक केल्याची तक्रार करणाऱ्या महिलेला खासदार नवनीत राणा यांनी मला विचारुन लफडा केला का? असे उत्तर दिले. खासदार राणा यांची आॅडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये चांगलीच व्हायरल होत आहे. महिला खासदार म्हणून महिंलाची बाजु घेण्याचे सोडून तिलाच 'लफडे विचारुन केले का? असा प्रश्न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.युवा स्वाभिमान पार्टीचा कार्यकर्ता असलेला उपेन बछले याने फसवणूक केल्याची तक्रार एका महिला खासदार नवनीत राणा यांच्या कडे केली. यात उपेन याने महिला तसेच ती राहत असलेल्या घरमालकाचा मोबाईल क्रमांक ब्लाॅक केल्याने तिने सांगितले १२ तारखेला खोलीचे भाडे दिले नाही. काॅल करतो म्हणतो, आणि करत नाही. मॅसेज करतो,फोन उचलला तर तिन सेकंदच बोलतो, मुलगी आणि मि साहित्य घेऊन कुठे जाऊ असा प्रश्न महिलेने खासदार नवनीत राणा यांना विचारला. त्यावर माझे काय घेणे देणे आहे, असे उत्तर राणा यांनी दिले. सोबतच मला विचारुन लफडे केले का? असा प्रतिप्रश्न खासदार राणा यांनी महिलेला केला. महिला खासदार म्हणून एका पीडित महिलेला अशाप्रकारे उत्तर दिल्याची आॅडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे.

*महिलेची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार*

पीडित महिलेने युवा स्वाभिमान पार्टीचा कार्यकर्ता असलेल्या उपेन बछले विरोधात परतवाडा पोलीस ठाण्यात या पुर्वीच तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तेथून तिला हुसकावून लावले. त्यानंतर महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती येथे उपेन बछले विरोधात तक्रार दाखल केली आहे. फेरजरपुरा पोलीस ठाण्यात देखील महिलेने सहा डिसेंबर रोजी तक्रार दाखल केली आहे.

Previous Post Next Post