हिवरखेड परिसरात नाल्या तुडूंब भरल्या,नालीच्या पाण्याने पसरली दुर्गंधी त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात,


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड परिसरात गेल्या काही दिवसापासून प्रत्येक गल्ली गल्लीत ,मेनरोळवर ,प्रत्येक नगरात, नाल्या तुडूंब भरल्या असून या नालीच्या दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले ,याकडे ग्रामपंचायतचे दुर्लक्ष दिसून येत आहे,तसेच सफाई कामगारांना वेळेवर पगार मिळत नसल्याने सुद्धा ही परिस्थिती आली असणार असे समजले जाते, ह्या तुडूंब भरलेल्या नाल्या आठवड्यात दोन वेळा नाही काढण्यात आल्या ,तर खूपच दुर्गंधीचा त्रास हिवरखेड वासीयांना सहन करावा लागणार व गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात येणार , याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा प्रश्नन मोकळा करावा अशी मागणी त्रस्त नागरिक करीत आहे,

Previous Post Next Post