धारणी तालुका भाजपाच्या वतीने भगवान बिरसा मुंडा स्मृती दिवस साजरा करण्यात आले...


धारणी तालुका प्रतींनिधी :- सुंदर पोटेकर,

दिनांक 9 जुन 2022 धारणी तालुका भाजपाच्या वतीने भाजपा जिल्हा अध्यक्षा श्रीमती निवेदीताताई चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासींचे अराध्य दैवत भगवान बिरसा मुंडा स्मृती दिवस अति हर्षो-उल्हासात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष . हिरालालजी मावस्कर व प्रमुख अतिथी म्हणून श्री. प्रभुदासजी भिलावेकर, माजी आयुक्त श्री. रमेशजी मावस्कर, जिल्हा उपाध्यक्ष श्रीमती रेखाताई मावस्कर, आदिवासी मोर्चाचे जि. अध्यक्ष श्री. सुखदेवजी पवार, माजी आमदार पटल्या गुरुजी, श्री. सदाशिवजी खडके, भटक्या जमाती ता. अध्यक्ष श्री. धोंडीबा मुंडे, जि. महामंत्री साबुलालजी दहिकर, महासचिव श्री. सुनिल लखपती, मयुरजी खापरे, सुशिलजी गुप्ता यांनी भगवान बिरसा मुंडायांच्या प्रतिमेची पुजा व माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात केली. कार्यक्रमात उपस्थित वक्तांनी सांगितले की, सण 1857 मध्ये इंग्रजांशी आपल्या तीर-कमानाणे लढा देऊन आपल्या जिवनाचे बलिदान दिले. सदर कार्यक्रमाचे सूत्र-संचालन भाजपा तालुका सचिव सुंदर पोटेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजपा ता. अध्यक्ष हिरालालजी मावस्कर यांनी केले. सदर कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.

Previous Post Next Post