रायखेड येथे दोन ठिकाणी घरफोडी,चोरटे गेले लाखो रुपयांची चोरी करून,मात्र हिवरखेड पोलिसाना चोरट्यांना पकडण्याचे आव्हान ,एकीकडे पोलिसांची संख्या कमी, दुसरीकडे चोरटे पसार, काय होणार या प्रकणात?

 


प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे रायखेड येथे दि. ९ जून च्या मध्यरात्री १ ते ३ वाजताच्या सुमारास आशिष नंदकिशोर नेमाडे वय ३१ वर्ष  व सुनिल मनोहर नेमाडे वय ४५ वर्ष दोन्ही शेतकरी यांच्या घरी चोरट्यांनी जबरी चोरी केली असल्याची घटना दि. १० जून रोजी सकाळी उघडकीस आली यामध्ये सोने चांदी व रोख रक्कम असा एकूण २३६,०००,०० ऐवज लंपास केला असल्याचे नेमाडे यांनी  हिवरखेड पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मौजे रायखेड येथील रहिवासी आशिष नेमाडे  यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की नऊ जून रोजी आम्ही घरातील सर्वजण जेवण करून दहा वाजता झोपलो तर घरातील एका खोलीत कांदा असल्याने त्या खोलीचा दरवाजा आतून बंद न करता उघडा ठेवला चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत चोरटे येथुन घराच्या आत शिरले व घरात कपाटावर ठेवलेल्या त्याच कपाटाच्या चाबीने लोखंडी कपाटाचा लाॅक उघडुन कपाटात ठेवले असलेल्या सोन्याचा अकरा ग्रॅमचा गळ्यातील हार मिनी पोत किंमत ३३००० रु‌ दोन दहा ग्रॅम च्या अंगठ्या ३०००० रु. तिनं लहान मुलांचे १.५ ग्रॅमचे ओम ४५०० रु. पाच  ग्रॅम चे कानातले झुमके १५००० रु‌‌. पंधरा ग्रॅम ची गोल मन्याची पोत ४५००० रु. ४.५ ग्रॅम चे लाॅकेट पेडंल  १३५०० रु.तसेच रोख रक्कम असा एकूण २३६००० रु ऐवजावर चोरट्यांनी हात सफा केला असल्याचे घरात झोपलेल्या आशिष नेमाडे यांच्या आई तिन वाजेच्या दरम्यान झोपेतून उठल्यावर उघडे असलेले कपाटाचे फाटक पाहून निदर्शनास आले तेंव्हा लगेच नेमाडे यांच्या आई ने घरातील सर्वांना झोपेतून उठविले आणि पहाटे  सहाच्या सुमारास गावात राहणाऱे काका यांच्या घरी सुद्धा चोरी झाल्याची माहिती मिळाली तेंव्हा लगेच त्यांना फोन करून तुमच्या घरी चोरी झाल्याचे सांगितले कारण सुनिल नेमाडे हे नातेवाईकांकडे सर्व कुटुंबासह लग्न समारंभासाठी बाहेर गावी गेल्याची संधी साधुन त्यांच्या राहत्या घराचा दरवाजा बंद होता चोरट्यांनी दरवाज्याचा कोंडा तोडुन घरात प्रवेश केला व घरातील लोखंडी कपाटाचा लाॅक तोडून कपाटातील ५०००० रु. रोख रक्कम पळविली या घटनेची दि‌‌. १० रोजी सकाळी  नेमाडे यांनी हिवरखेड पोलीस स्टेशन ला रितसर तक्रार केली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून हिवरखेड पोलीसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास हिवरखेड बपोलीस करीत आहे,

घटनास्थळी आयकार युनिट ची भेट

रायखेड येथील जबरी चोरीची बातमी वाऱ्या सारखी पसरली होती तेव्हा अकोला येथुन आयकार युनिट चे पथक दाखल झाले आयकार युनिट कडून फिंगर तपास केला असून शोध सुरू आहे

रायखेड येथे दोन ठिकाणी घरफोड्या करुन घडलेल्या चोरीच्या घटनेचा कसुन तपास करुन शोध लावला जाईल हात सफा करून पळून गेलेल्या चोरट्यांना लवकरच बेड्या ठोकु,

विजय चव्हाण, ठाणेदार हिवरखेड पोलीस स्टेशन

विषय लाईन,

एकीकडे हिवरखेड पोलीस स्टेशनला पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कमी, तर दुसरीकडे लाखो रुपयांची चोरी  करून चोर लंपास,   या प्रकरणात नेमकं काय होते यांकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले  आहे,

Previous Post Next Post