हिवरखेड परिसरात तुफान आलं,सौंदळा दानापूर मार्गावर वृक्ष कोसळले मार्गात अडथळा,


 प्रशांत भोपळे/हिवरखेड प्रतिनिधी...

हिवरखेड परिसरात दिनांक  ९ जून च्या संध्याकाळी अचानक आलेल्या वादळी पावसात अनेक वृक्ष कोसळल्याने मोठी हानी झाली , बऱ्याच शेतकऱ्यांच्या पिकाचे सुद्धा नुकसान झाले, गावा बाहेरील मार्गावर असलेल्या गजानन दाभाडे यांच्या बियर बार बाजूला वृक्ष कोसळले तर सौंदळा दानापूर} मार्गावर अनेक वृक्ष कोसळल्याने हा मार्ग बंद पडला या मार्गवार कोसळल्या झाडांनखाली एक मोटरसायकल तर एक कार आढळून आली, यावरून मोठी हानी झाल्याचे समजते, तसेच आकोट दानापूर आखरी टाईम जाणारी बस  रस्त्यावर झाडें कोसळल्याने पुढे प्रवाशांना घेऊन  जाऊ शकली नाही, या संबधीत अधिकाऱ्यांनी याबत लक्ष देऊन मार्ग मोकळा करून प्रवाशांन बाबत चौकशी करून नुकसान भरपाई करावी अशी मागणी नुकसान धारक करत आहेत,

Previous Post Next Post