फॉरेस्ट डिझर्व जंगल सिपना वन्यजीव विभाग सेमाडोह जवळ
गेल्या आठवड्यात वन्य प्राणी बाराशिंगा या चार-पाच प्राण्यांचा पाणवठ्यावर पाणी पिल्याने पाणवठ्यावर संशयास्पद मृत्यू झाला होता मानवरहित या जंगलामध्ये वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्वठयात पाण्यात अज्ञात व्यक्तीने विषारी द्रव्य मिसळून त्यांचा घात केला असल्याचा संशय वन विभागाच्या वरिष्ठ अधिकार्या कडून ऐकावयास मिळते होते मृत्यू पावलेल्या प्राण्यांचे पोस्टमार्टम पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केले होते ज्या जंगलात इतर कोणालाही परवानगी नसताना त्या जनावरांना व्यक्ती कोण?असा प्रश्न जनसामान्य नागरिकांसमोर उभा असताना वनखाते हे प्रकरण सारवासारव करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते मेळघाटातील वन्य प्राण्यांची सुरक्षा धोक्यात असल्याचे बोलले जात आहे.फॉरेस्ट रिझर्व वनखात्यात वनविभागाचे कर्मचारी फारच कमी असल्याने अशा घटना सातत्याने घडत असल्याचे ही चर्चा ऐकायला मिळाल्या वन खात्यात अनेक पदे रिक्त असून वरिष्ठ अधिकाऱ्यांची सुद्धा काही पदे रिक्त आहेत वनकर्मचारी वनरक्षक अशी अनेक पदे रिक्त असल्याने जंगलाची व प्राण्यांची सुरक्षा मजुरांच्या भरोशावर चालत असल्याने अनेक प्राण्यांना जीवास मुकावे लागत आहे.मेळघाटमध्ये 2600 कर्मचारी शासनाकडून अपेक्षित असताना मेलघाट मध्ये अंदाजे बाराशे ते एक हजार कर्मचारी क्लास वन क्लास २ क्लास ३ क्लास फोर असे पदावर कार्यरत आहेत.जंगलाची सुरक्षा वाऱ्यावर असून अनेक ठिकाणी नाक्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून मजुराच्या भरोशावर जंगलाची सुरक्षा चालत असल्याचे बोलले जात आहे फॉरेस्ट विभागाचा गलथान कारभार म्हणजे 2018 या वर्षा पासून फॉरेस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांना ड्रेसेस वर्दी मिळाली नसल्याचे खात्रीलायक वृत्त आहे यावरून सिद्ध होते की मेळघाटच्या फरक विभागात चालले तरी काय असा प्रश्न जनसामान्य नागरिकां समोर उभा आहे बारशिंगा शिकार की हत्या या तपासासाठी वनविभागाचे कर्मचारी सेमाडोह वरून वीस किलोमीटर अंतरावर रायपूर येथे तपासासाठी गेले असता त्या गावातील नागरिकांनी कर्मचाऱ्यांना किडनॅप करून ठेवले असल्याचे वृत्त आहे.रात्रीच्या अंधारात कर्मचारी व गावातील ग्रामस्थांमध्ये हा संघर्ष झाल्याने आपला जीव मुठीत धरून वनकर्मचारी जंगलात पळालेअसल्याचे त्या गावातील नागरिकांनी सांगितले तर काही कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी विटी धरून घरात बंदिस्त केल्याचे खात्रीलायक वृत्त दबक्या आवाजात माहिती पडले.चिखलदरा पोलीस स्टेशनच्या 112 इमर्जन्सी कॉल वरून माहिती मिळाली की काही वन कर्मचाऱ्यांना बंदी करून ठेवल्याने रात्रीच्या वेळी घटनेची गंभीरता लक्षात घेऊन चिखलदरा पोलिस स्टेशनचे ठाणेदार राहुल वाढवे यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी पाठवून बंदिस्त कर्मचारी सुटका केल्याची माहिती पुढे आली.आता या वन्य प्राण्यांच्या सुरक्षेसाठी टायगर विभाग चे मुख्य वनसंरक्षक कोणती उपाययोजना करतात हे पाणी आता गरजेचे असून वन्य प्राण्यांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याची चर्चा मेळघाट मधील नागरिकांमध्ये सुरू आहेत या अगोदर सुद्धा वाघ बिबटे हरिण अशा दुर्मिळ प्राण्यांची शिकार विविध वर्तुळात झाली होती.परंतु नेहमीप्रमाणे वनखाते जबाबदारी झटकून आदिवासी नागरिकांना वेठीस धरून थातूरमातूर चौकशी या नावाखाली प्रकरणी असल्याच्या चर्चा नागरिका कडून बोलले जात आहे
