खोगडा जामली( आर )मेळघाट वन्यजीव विभाग परतवाडा अंतर्गत येत असलेल्या जामली वनपरिक्षेत्रातील अंबापाटी शेत शिवार नागझिरा शिव जंगलात दिनांक १३/६/०२२ रोजी रात्री जंगलात शेतकऱ्यांचे गुरेढोरे कुरवाळत असताना भक्ष्यांच्या शोधात बिबट्याने एकाच रात्री जनावराची नरडी फोडून ठार केले आहे यामध्ये आंबापाटी येथील माणिक रघुजी भाकरे यांच्या मालकीचे दीड वर्षाच्या वासराची शनिवार ता 11 जून रोजी संध्याकाळी 8 वाजताच्या दरम्यान घरातील गोठ्यातच शिकार केली गिरगोटी जवळ शेतात शोबेराम कासदेकर यांच्या वासरा वर सुद्धा बिबट्याने झडप घालून वासराला ठार मारण्याचा प्रयत्न केला सोबेराम यांनी आरडाओरडा करून वासराचा जीव वाचवला तर दुसऱ्या घटनेत जयंत चव्हाण यांच्या शेतातील गोठ्यातच वासराचा पडशा पाडला खोगडा येथील एका नागरिकांच्या बकरीवर या बिबट्याने हल्ला चढवल्याने एकच खळबळ माजली आहे सकाळी 5 वाजताच्या दरम्यान घटना घडली या बिबट्या मुळे या भागात दहशत निर्माण झाली आहे जामली वनपरिक्षेत्रात जवळपास दहा गावे येतात या गावाला लागूनच मेळघाट वन्यजीव विभागाचे जंगल आहे यात नेहमी वन्यप्राण्यांचा वावर असतो एखादेवेळी मानव विरुद्ध वन्यप्राणी यांचा संघर्ष उडत असतो त्यात बऱ्याच वेळा मानव हानी सुद्धा झाली आहे तर मोठ्या प्रमाणात पाळीव प्राणी मारल्या गेली आहेत या अगोदर आढाव व दांभिया या गावातील युवकांवर अस्वलीने हल्ला केला होता त्यात ते गंभीर जखमी झाला होता वन विभागा कडून कोणतीच आर्थिक मदत मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे अशाच प्रकारे वन्यप्राण्यां कडून शेतकऱ्याची पाळीव जनावरे मारल्यास नुकसान भरपाई ची तरतूद फॉरेस्ट विभागात आहे पण परंतु वनाधिकाऱ्या कडून पंचनामा करून सुद्धा मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना आज पर्यत नुकसान भरपाई मिळाली नाही अशी पिडीत नुसकान ग्रस्त नागरिकांचे म्हणणे आहे या वेळी वन्य प्राणी शिकारीच्या शोधात भटकत असतात त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे असे आव्हान सुद्धा खोगडा जांमली आर ) वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी गस्त वाढवलेली आहे
जामली वन परिक्षेत्रात बिबट्या मोकाट एकाच रात्री तीन जनावरांचा घेतला बळी, अंबापाटी खोगडा नागझिरा शेत शिवारात घटना..
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...
