बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी/सुरज देशमुख...
खामगाव तालुक्यातील बोथाकाजी येथील रहिवाशी व सद्या पुणे येथे शिक्षण घेत असलेली भावना गंगाधर हिवराळे या विद्यार्थिनीने नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविले आहे. गोवा येथे नुकत्याच वय चार ते १८ वयोगटातील नॅशनल किक बॉक्सिंग स्पर्धा-२०२२ पार पडल्या. या स्पर्धेत प्रथमच भावना हिवराळे हिने ५३ किलो वजन गटात सहभाग घेतला होता. तिला प्रशिक्षक साबिर शेख, प्राजक्ता जगताप यांचे मार्गदर्शन लाभले. विशेष म्हणजे भावना हिचे आई- वडील शेत मजूर असुन त्यांना एकुलती एक मुलगी आहे. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी गत दोन वर्षापूर्वी बोथाकाजी गाव सोडून थेट पुणे गाठले आहे. तेथे ते मोल- मजुरी करून मुलीला शिक्षण देत आहेत. भावना सद्या डी. वाय. पाटील महाविद्यालयात इयत्ता १२ वीत शिकत आहे.
