प्राचीन काळापासून मेळघाट आदिवासी बहुल क्षेत्रात दरवर्षी “भावई” हा त्योहार अतिउत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक गावात शेतकरी आपल्या-आपल्या घरातून अन्न-धान्य घेवून शेतकरी गावाबाहेर जाऊन आपल्या इष्ट देवताचे पुजा पाठ करतात.प्राचीन काळापासून ही परंपरा मेळघाटात सुरू आहे. या अनुषंगाने अंबाडी गावात ही बहुसंख्य शेतकर्यांनी पुजा-पाठ केले. शेतकरी शालिकराम मावस्कर तसेच अंबाडी गावाचे पोलिस पाटील श्री. चंद्रसेन नांदुरकरजी यांनी संगितले की, शेतकर्यांना चांगले पीक व्हावे, तसेच अधिका-अधिक पाऊस पडला पाहिजे यासाठी गावातील सर्व शेतकरी बंधु आपल्या इष्ट देवताला प्रसन्न करण्यासाठी हा सण दरवर्षी साजरा करण्यात येते. संध्याकाळी गावातील सर्व नागरिक एकत्र येऊन गावात आदिवासींचे प्रसिद्ध नृत्य “गादली सुसून” करून अतिउत्साहाने साजरा करते. दिवस भर नृत्य-गान करून गावातून धान्य एकत्र करून, दुसर्या दिवशी मंदिरात जाऊन तिथे पुर्ण जेवण तयार करून संपूर्ण गावातील नागरिक एकत्र एकत्र जेवण करतात आणि आजच्या दिवसापासून शेतकरी पेरणी करण्याची सुरवात होते. खरोखरच “भावई” हा सण मेळघाटात पाहणे योग्य आहे.
मेळघाटात “भावई” त्योहाराची धुम...
****धारणी तालुका प्रतींनिधी :- सुंदर पोटेकर...
