संग्रामपूर तालुक्यामध्ये आजपर्यंत अनेक अधिकारी व तहसीलदार आलेत व बदलून गेले परंतु कोणत्याही अधिकारी वर्गाने पत्रकाराची दखल घेवून पत्रकाराचा सन्मान व सत्कार साजरा केला नाही.परंतु संग्रामपूर येथे गेल्या ६ महिन्यापूर्वी नव्याने आलेले तहसिलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी आपल्या कर्मचाऱ्यां सोबतच सामान्य जनतेत व पत्रकारांना सोबत घेवून चांगल काम करीत आहेत.विशेषतः नायब तहसिलदार व कर्मचाऱ्यांचा मोठ्या सन्मानाने वाढदिवस साजरा करीत असतात. आणि दिनांक ४/जुलै रोजी संग्रामपूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी संग्रामपूर येथील तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी दयालसिंग चव्हाण यांचे वाढदिवसानिमित्त आज तहसिल कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात पत्रकार म्हणून निर्भीडपणे काम करीत असून विकासात्मक बातम्या लिहून उत्कृष्ट काम करीत असल्याने दयालसिंग चव्हाण पत्रकार यांचा शाल, श्रीफळ,पेढे , व पुष्पहार तसेच भेट वस्तू देऊन सत्कार केला.ह्यावेळी नायब तहसीलदार विजय चव्हाण, हरीभाऊ उकर्डे, जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तहसिलदार म्हणाले पत्रकारांना जे दिसते ते लिहितात. बदनामी कारक बातम्या विनाकारण देत नाहीत. ह्या तालुक्यातील पत्रकारांची भुमिका वेगळीच असून सकारात्मक व विकासात्मक लिखाण करुन अधिकारी ,कर्मचारी यांना सहकार्य करतात. कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदनामी होवू नये .ह्याकरीता जनतेची व विकासात्मक वेळेवर व चांगली कामे करावीत आसा सल्लाही उपस्थित कर्मचाऱ्यांना दिला. तसेच पत्रकार,अधिकारी ,कर्मचारी यांचा समन्वय आसण आवश्यक आहे. ह्यावेळी ना.तहसिलदार विजयसिंह चव्हाण ,हरीभाऊ उकर्डे,जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी यांनीही आपलं मत व्यक्त केलं.ह्यावेळी संग्रामपूर महसूलचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नैसर्गिक आपत्ती विभाग प्रमुख डाॕ.एस.ए.सरवदे यांनी केले.
तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांनी केला उत्कृष्ट व निर्भीड लिखाण करणारे पत्रकार दयालसिंग चव्हाण यांचा सन्मान...
संग्रामपुर ता.प्रतिनिधी:-
