जळगांव जा.प्रतिनिधी:-
खरी श्रीमंती ही गरजूंना अन्नदान करण्यातच असते या उक्तीप्रमाणे स्थानिक जळगाव जामोद शहरांमध्ये राहणारे व्यावसायिक परेशशेठ पलन यांनी त्यांच्या मातोश्री स्वर्गवासी निर्मळाबेन पलन यांच्या स्मृतिदिना प्रित्यर्थ आदिवासी दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांना मिष्ठांन भोजन देण्याचे ठरविले होते. म्हणून आदिवासी दुर्गम भागातील चारबन येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थ्यांना भोजन वितरित केले. यावेळी निरागस आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर अलौकिक हास्य फुलले होते. विद्यार्थ्यांनी या मिष्ठांन भोजनाचा आनंद घेत भोजन केले. यावेळी परेश पलन, पंकज पलन, सीमा पलन,सोनल पलन,आरती पलन, शाळेचे शिक्षक दीपक उमाळे यांच्यासह शाळेचे इतर शिक्षक व शाळा व्यवस्थापन मंडळ उपस्थित होते यावेळी शाळा व्यवस्थापना तर्फे परेश पलन यांचे शाळा प्रशासनाने आभार मानले.
