बापूमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे येथे पदव्युत्तर अभ्यासक्रमास मान्यता...


पिंपळगाव काळे प्रतिनिधी:-

स्थानिक सातपुडा शिक्षण व ग्रामीण विकास संस्था पळशी वैद्य द्वारा संचालित बापूमिया सिराजोद्दीन पटेल  कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पिंपळगाव काळे तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा येथे शासनाने एकूण अकरा विषयांना पदव्युत्तर  अभ्यासक्रमास मान्यता प्रदान केलेली आहे. जळगाव जामोद तालुक्यामधील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना कमी खर्चात दर्जेदार  उच्च शिक्षण देता यावे यासाठी संस्था नेहमी प्रयत्न करत असते. संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये केजी ते पीजीपर्यंत एकाच ठिकाणी शिक्षण देणारे अल्पसंख्यांक दर्जा प्राप्त एकमेव संस्था असून संस्थेमध्ये उच्चविद्या विभूषित व विशेष शिक्षकांची संस्थेने नियुक्ती  केलेली असून त्यांच्या मार्फत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना दर्जेदार शिक्षण देण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. भविष्यामध्ये संस्थेद्वारा विद्यार्थ्यांकरता विविध उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मानस संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट सलीम बापूमिया पटेल यांनी बोलून दाखविला आहे. महाविद्यालयांमध्ये सध्या विज्ञान शाखेमध्ये एम. एससी. प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भौतिकशास्त्र व गणित तसेच कला शाखेमध्ये एम. ए. इंग्रजी, मराठी, उर्दू, समाजशास्त्र, अर्थशास्त्र या विषयांमध्ये व वाणिज्य  शाखेमध्ये एम. कॉम. इंग्रजी व मराठी माध्यम असे दोन्ही माध्यमांमध्ये शासन परवानगी प्राप्त झालेली आहे. वरील सर्व शाखा व विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी साठी प्रवेश प्रक्रिया लवकरच  सुरु होणार असून सदर विषयांना मान्यता मिळाल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग घ्यावा व उच्च शिक्षण घ्यावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष एडवोकेट सलीम पटेल व सचिव विजय अंभोरे, सहसचिव रब्बानी देशमुख, प्राचार्य डॉ.  राजा तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी जळगाव जामोद तालुक्यातील व परिसरातील पालक व विद्यार्थ्यांना केले आहे.

Previous Post Next Post