आदिवासी गौरव दिनानिमित्त फैजपूर येथे भव्य रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद..


 शब्बीर खान/फैजपूर.ता.यावल..

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि ०९ आॅगष्ट जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त फैजपूर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करून आदिवासी दिन साजरा करण्यात आला.रक्तदान शिबीराचे आयोजन आदिवासी तडवी भिल्ल बहुद्देशीय सभागृह तडवी वाडा फैजपूर या ठिकाणी करण्यात आले होते.रक्तदान शिबिर प्रसंगी सर्वप्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला फैजपूर फैजपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगांवकर,पोलीस उपनिरीक्षक मकसूद्दीन शेख,पोलिस उपनिरीक्षक मोहन लोखंडे यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.व रक्तदान करून सुरुवात करण्यात आली. सामाजिक दायित्व म्हणून या रक्तदान शिबिराचे आयोजन तडवी समाज फैजपूर व तडवी फैजपूरीयन्स गृप व तडवी समाज फैजपूर यांच्यातर्फे करण्यात आले होते.दरवर्षी प्रमाणे यंदाही फैजपूर येथे तडवी भिल्ल समाज बांधवांमार्फत जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या वर्षी रक्तपुरवठा कमी पडत असल्याने सामाजिक दायित्व म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात आदिवासी बांधव तसेच परिसरातील नागरिकांनी या शिबिरात सहभागी होऊन एकूण ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले.यावेळी इंजिनिअर राजू तडवी यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्र देण्यात आले.रक्तदान शिबिराला आसेम संस्थापक अध्यक्ष राजू बिऱ्हाम तडवी,माजी उपनगराध्यक्ष रशीद तडवी,युवक काँग्रेस शहर अध्यक्ष वसीम तडवी,खिरोदा बॉईज, सामाजिक कार्यकर्ते इरफान शेख इकबाल,भारत चौधरी, नंदकिशोर अग्रवाल सहाय्यक फौजदार हेमंत सांगळे, फकिरा तडवी पोलिस, शरीफ तडवी पोलिस,आमीन तडवी पोलिस,समाजसेवक डॉ.दानिश,शाकिर,नेहरू युवा केंद्र चे पल्लवी तायडे आदींनी भेटी दिल्या.यावेळी इंजिनिअर राजू तडवी,माजी उपनगराध्यक्ष रशीद तडवी,सामाजिक कार्यकर्ते अरमान तडवी,फतू तडवी,आमद तडवी,फिरोज तडवी,असलम तडवी,आरिफ तडवी,यांच्यासह आदिवासी तडवी भिल्ल समाज बांधव फैजपूर यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.यशस्वीतेसाठी युनूस तडवी,जाकीर तडवी,दस्तगिर तडवी,आसिफ तडवी,जाविद तडवी, इरफान तडवी,रोशन तडवी,मोहसीन तडवी,सलाउद्दीन तडवी,तस्लिम तडवी, साजिद तडवी यांच्यासह तडवी फैजपूरीयन्स गृप च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.प्रास्ताविक व आभार युनूस तडवी यांनी मानले.यावेळी रक्तदान शिबिराचे काम फैजपूर येथील नवसंजीवनी रक्त पिढीचे नितिन सर व स्टाफ यांनी काम पाहिले.

Previous Post Next Post