२ ऑक्टोबर १९९४ गांधी जयंती चे औचित्य साधून सातपुडा शिक्षण संस्था, जळगांव जामोद ने सातपुड्याच्या पायथ्याशी वरवट बकाल या तुलनेने दुर्गम गावामध्ये उच्च शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.आ.श्री. कृष्णराव इंगळे यांचे दूरदृष्टीने आज कला, वाणिज्य व विज्ञान या शाखांमधून हजारो विदयार्थी शिक्षण घेत आहेत... माननीय कृष्णरावजी यांचे अथक प्रयत्नातून वर्ष २०२२-२३ पासून याच महाविद्यालयात आता पदव्युत्तर शिक्षणाची सुद्धा सोय उपलब्ध झाली आहे. कला शाखेअंतर्गत एम. ए. अर्थशास्त्र व राज्यशास्त्र, वाणिज्य शाखेअंतर्गत एम. कॉम. तसेच विज्ञान शाखेअंतर्गत M.SC. रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र असे एकूण सहा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याची मान्यता नुकतीच महाराष्ट्र शासनाने दिली आहे.पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमा करीता आवश्यक सर्व पायाभूत सुविधा महाविद्यालयात उपलब्ध असून आपल्या भागातील संबंधित तरुण तरुणींना MA, M.Com किंवा M.SC. करण्याकरिता आता बाहेरगावी जाण्याची आवश्यकता नाही....अगदी माफक खर्चामध्ये कला वाणिज्य महाविद्यालय, वरवट बकाल येथे आता ही सुविधा उपलब्ध आहे..
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वरवट बकाल येथे पदव्यूत्तर अभ्यासक्रमास मान्यता...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
