जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम सुनगाव येथे दिनांक 16 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त किशोरी मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका उमाळे मॅडम ह्या होत्या तसेच यावेळी किशोरवयीन मुलींना आशासेविका गिताबाई बैस,मंदा मिसाळ यांनी सखोल असे मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन करताना मुलींसमोरील विविध समस्या व त्यावरील उपाय, मुलींसमोरील आरोग्य समस्या शारीरिक व्याधी यासह बालविवाहाचे दुष्परिणाम काय असतात याविषयी मुलींना सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयीन मुलींनी आहार कोणता घ्यावा कसा घ्यावा याबाबत सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका गवई मॅडम यांनी केले तर आभार अंगणवाडी सेविका चंदाताई चिंचोलकार यांनी मानले. यावेळी अंगणवाडी सेविका मीना जोशी, सुनिता भड, अनुसया वंडाळे,सखुबाई पाटील, शांता कोथडकार, वेणू वानखडे, गीता दामधर, पुष्पा सांगळे, मदतनीस प्रमिला तायडे, आम्रपाली अंदुरकार, वैशाली आकोटकार, शोभा कतोरे, वर्षा धर्मे,आरेफाबी मालेखा आशा सेविका उज्वला मिसाळ,सुनिता ढगे,रेखा भगत, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका यांचेसह गावातील किशोरवयीन मुलींची मोठ्या संख्येने उपस्थित होती. सदर कार्यक्रम यशस्वी करिता, ग्रामपंचायत सुनगाव येथील कर्मचारी व जिल्हा परिषद शाळेच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
सुनगाव येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त किशोरी मेळावा संपन्न...
जळगांव जा.प्रतिनिधी:-
