स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जारीदा प्रादेशिक वन विभागाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन..पत्रकार नितीन वरखड़े ,प्रशांत पंडोले व मंगेश निवतकर यांचे स्वागत करून यांना दिला वृक्षरोपणाचा मान...


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

भारतीय स्वातंत्र्याचा ७५ व्या वर्षाचा निमित्ताने संपूर्ण भारतात विविध विभागामार्फत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.मेळघाटातील प्रादेशिक वन विभाग जारीदा चा वतीने सुद्धा दि.१३ते १५ आगस्ट दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मा.प्रदीप भड वन परीक्षेत्र अधिकारी जारीदा प्रभारी याचा मार्गदर्शने नुसार दि.१३ रोजी राहू वर्तुळा तुन स्वातंत्राचा अमृत महोत्सव कार्यक्रमाची सुरुवात झाली.राहू वर्तुळातील मा.अनिस शेख वर्तुळ अधिकारी यांचे नियोजनानुसार राहू  गावातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली . बाईक रॅली मध्ये वन विभागातील वन कर्मचारी व गावातील लोकांनी सहभाग घेतला.ही रॅली राहू गावातून निघून खारी, हिरडा,गावात जाऊन गावात देशभक्ती घोषणा दिल्या.भारत माता की जय अश्या घोषणा देत संपूर्ण खारी गावात फिरून नागरिकांचा मनात देशभक्ती जागृत केली.खारी गावातील आरोग्य उपकेंद्र येथे भेट देऊन डॉ.सागर कोगदे आरोग्य सामुदाय अधिकारी व जिल्हा परिषद शाळा खारी येथील विदयार्थी,शिक्षक कर्मचारी यांना भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आले. उपस्थित मान्यवर नागरिक व कर्मचारी यांना अनिस शेख वर्तुळ अधिकारी राहू यांनी देश भक्ती विषयी मार्गदर्शन केले.त्यानंतर दिनांक १४ रोजी वन परीक्षेत्र कार्यालय जारीदा येथे धज्वारोहन सर्व कर्मचारी वृद यांनी केले. व जारीदा गावात देशभक्ती विषयी जनजागृती करण्यात आली.त्या नंतर सर्व वन कर्मचारी हे जारीदा आश्रम शाळा येथे देश भक्ती घोषणा देत पोहचल्या व आदिवासी विदयार्थी यांना उपस्थित वन कर्मचारी यांनी देशभक्ती विषयी मार्गदर्शन केले.त्यानंतर वन कर्मचारी यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समिती सदस्य यांचा सोबत सामूहिक बाईक रॅली चुरणी,कोटमी,दहेन्द्री,पलश्या या गावातून काढली.दहेन्द्री गावातील  प्रथम नागरिक श्री.संजू साकोम सरपंच यांनी वन कर्मचारी सोबत ध्वजारोहण करून वन कर्मचारी यांचे मनोबल वाढविले.दि.१५ रोजी सर्व वन कर्मचारी यांनी ध्वजारोहण केले.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने वृक्ष रोपण करण्यात आले.श्री.नितीन वरखडे पत्रकार,श्री.डॉ.अजय ठोसरे आरोग्य सामुदाय अधिकारी जारीदा,डॉ अंकित राठोड आरोग्य सामुदाय अधिकारी श्री,अरविंद वानखडे आरोग्य सेवक जारीदा,यांचा हातून आरोग्य उपकेंद्र जारीदा येथे वृक्ष रोपण करण्यात आले. श्री.सुशांत काळे वन परीक्षेत्र अधिकारी मेळघाट व्याघ्र प्रकल्प जारीदा व गट ग्राम पंचायत मेहरीयाम श्रीमती रुपाली राजू जामुनकर सरपंच, मंगेश निवतकर पत्रकार , व श्री.गजू चव्हाण सचिव यांचा शुभ हस्ते ग्राम पंचायत परिसरामध्ये वृक्ष रोपन करण्यात आले. त्यानंतर विज वितरण कंपनी उपकेंद्र जारीदा येथे श्री.वैभव नाईक उप अभियंता,श्री प्रशांत पंडोले पत्रकार श्री,अनिस शेख यांनी वृक्ष रोपण केले.वन कर्मचारी यांनी दि.१३ते १५ या तीन दिवसात विविध कार्यक्रमाचे आयोजन करून ७५ स्वातंत्र्याचा अमृत महो त्सव यशस्वीरित्या संपन्न केला. सचिन सदाफळे वर्तुळ अधिकारी कारंज,अनिस शेख वर्तुळ अधिकारी राहू,देविदास कासदेकर वर्तुळ अधिकारी खारी, महादेव बेलकर वर्तुळ अधिकारी एकताई, पी.जी.मावदे वर्तुळ अधिकारी वी.बी.नायकोडे,बी.एस.,ए.वि.माहोरे एम.बी.पवार.एस.एस.जगदाळे,पी.ए,चिमोटे,एस.बी.बेठेकर,वि.जी.मेहरे,ए.एम.वैद्य,एस.आर.धुर्वे ,कु.आर.डि.भूसुम,कु.एस.पी.गुज्जर,कु.एस.झेड.अखंडे,कु.पी.एम.सावलकर,कु.ए.एस.येवले,श्री.एस.एस.इंगळे,कु.बेहरे वनरक्षक,पी.बी.बिसंदरे,झेड.चिमोटे पुण्या मुंडे,एस.एम.पाठक लेखापाल वन कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post Next Post