जळगाव जामोद तालुक्यातील ग्राम रसूलपूर येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 16 ऑगस्ट रोजी आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत किशोरी मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित महिला व किशोरवयीन मुलींना योग्य मार्गदर्शन करून आरोग्या विषयी माहिती दिली. स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव सुरू असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन शासन स्तरावरुन केलेले आहे. यानिमित्ताने रसूलपूर येथे जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळांमध्ये किशोरी मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाची सुरुवात करताना सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी अंगणवाडी सेविका कविता वानखडे तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच हसीना परवीन तसेच डॉ फरहीन शेख डॉक्टर अहमद व रसूलपूर येथील अंगणवाडी सेविका शबाना बी, शमशाद तडवी, आरोग्य सेविका अलका वानखडे, वहिदा तडवी तसेच वर्षा वानखडे अफसाना बी ,राजकन्या मोरे आणि ग्रामपंचायत सदस्य अब्दुल समद ,मनवर तडवी व शिक्षक वृंद उपस्थित होते या किशोरी मिळावे ला डॉक्टर फरहीन शेख यांनी उपस्थित महिला व मुलींना मार्गदर्शन करताना सांगितले की मुलींसमोर काय काय आरोग्य समस्या येतात आणि बालविवाहाचे दुष्परिणाम काय असतात आणि आपल्या आरोग्य वर कसे लक्ष द्यावे हे सुद्धा सांगितले कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक यांनी केले.
रसूलपूर येथे किशोरी मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी:-
