अंबालिका नवदुर्गा उत्सव मंडाळा तर्फे रक्तदान शिबिर संपन्न...45 रक्तदात्यान्नी केले रक्तदान...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

नवरात्री च्या पावन  पर्वा वर तसेच  महात्मा गांधी  जयंती चे  औचित्य साधत  दिनांक 2ओक्टोबर  रोजी स्थानिक. मानाजी चौकात अंबालिका नवदुर्गा उत्सव मंडळा तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन  करण्यात आले  होते. यावेळी 45 रक्तदात्यान्नी रक्तदान केले त्यातील वाढदिवसानिम्मीत रक्तदान करणारे  योगेश बोन्द्रे यांचा आमदार डॉ. संजय कुटे यांचे स्वियसहाय्यक निलेश शर्मा यांनी शाल व पुष्प  गुच्छ देऊन सत्कार केला.राष्ट्रीय कार्यास हातभर लगावा या उद्देशाने रक्तदान करणारे  मंजूर  भाई  यांचे  रक्तदान लक्ष्यवेधी ठरले. मंडळाचे  अध्यक्ष, सर्व पदाधिकारी व सदस्यनी  सुद्धा उसफुर्त पने  या शिबिरात सहभाग नोंदवित रक्तदान केले. अकोला येथील  हेडगेवार रक्तपेढ़ी ची  चमु  या शिबिरात निमंत्रित करण्यात आली  होती, याप्रसंगी  त्यांचे मोलाचे  सहकार्य लाभले. या शिबिरा ला अनेक मान्यवरनी  भेटि  सुद्धा दिल्या व या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक  केले. नवदुर्गा उत्सव मंडळाने सुद्धा सामाजिक बाँधीलकी जोपासत प्रबोधन पर  कीर्तने, रक्तदान, वृक्षरोपण  यासारखे  समाज उपयोगी कार्यक्रम आयोजित  केले होते.

Previous Post Next Post