जळगाव जामोद तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस आढावा बैठक संपन्न...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जामोद तालुका युवक ची बैठक दिनांक 3-10-2022 सोमवार रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष प्रमोदभाऊ सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली  जळगाव जामोद येथे पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा,तालुका व शहर कार्यकारणी तयार करणे युवक शाखा व बूथ कमिटी स्थापन करणे. भाजपा सरकारच्या काळात प्रचंड बेरोजगारी वाढली आहे. व वेदांता ग्रुपचा जो प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता तो प्रकल्प गुजरातला वळविण्यात आला. त्यामुळे दीड ते दोन लाख युवकांना रोजगाराला मुकावे लागले. याच्या निषेधार्थ बेरोजगारांना रोजगार मिळाली पाहिजे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी येणाऱ्या काळात आंदोलन उभे करेल. तळागाळातील युवकां पर्यंत पोहचुन पक्ष संघटन वाढीसाठी काम करने या विषयावर सदर बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली.या बैठकीला  विधानसभा अध्यक्ष प्रकाशशेठ ढोकणे,जिल्हा सरचिटणीस संदीप उगले, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष एम डी साबीर भाई, शहराध्यक्ष अझहर देशमुख,युवक जिल्हा कार्याध्यक्ष पराग अवचार, जिल्हा कार्यकारणी सदस्य शेख जावेद भाई,युवक विधानसभा अध्यक्ष दत्ता डिवरे,युवक तालुकाध्यक्ष अनूप महाले,युवा नेते आशिष वायझोडे, ईरफान शेट्टी, दादाराव धंदर, युवक चे जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान, जिल्हा सरचिटणीस योगेश कुवर, युवक तालुका कार्याध्यक्ष योगेश बोराखडे, शहराध्यक्ष ताहेर शेठ, शहर कार्याध्यक्ष सिद्धार्थ हेलोडे,संजय दंडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख रोहित पवार, गौरव पाटील,सिद्धार्थ इंगळे,शुभम रोठे, सदाशिव जाणे,मुस्ताकीम, शिवाजी वरखेडे, खालीद माही, अताऊल्लाह खान,अक्षय कुनगाडे,अतिक रहमान,शाहरुख तडवी,अमोल वाघ, रतन वानखडे, कुरबान खान, अमान खान, शेख नजीम बहूसंख्य युवक कार्यकर्ते प्रामुख्याने बैठकीला उपस्थित होते.विधानसभा अध्यक्ष प्रकाश ढोकने, संदिप उगले,अजहर देशमुख, एम.डी.साबीर,आशिष वायझोडे, दत्ता डिवरे,अनूप महाले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Previous Post Next Post