मंगल काकडे/ जळगाव जा.ता.प्रतिनिधी..
जळगाव जामोद येथे अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या तालुका अध्यक्ष बेबीताई दाते यांच्या अध्यक्षतेखाली तालुका कमिटीची बैठक १७/१२/२०२२ शनिवार रोजी संपन्न झाली.या बैठकिला संघटनेच्या जिल्हा सचिव कॉ.प्रतिभाताई वक्टे ह्या उपस्थित राहून त्यांनी २७ डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर आयोजित करण्यात आलेल्या मोर्चा बाबत करावयाच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन केले.तसेच सेवानिवृत्त झालेल्या सेविका मदतनीस यांना ग्रॅज्यूटीच्या निर्णयाची माहिती देऊन त्यांच्याकडून ग्रॅज्यूटीचे फॉर्म भरून घेण्यात आले.यावेळी संघटनेच्या जिल्हा कमिटी मेंबर सरलाताई मिश्रा,सविता ताई चोपडे , वंदना डोंगरदिवे , दुर्गा वानखडे, लक्ष्मी गवई, कौशल्या सातव, प्रविणा बगाडे, कांता सपकाळ, नजमा,इत्यादी जेष्ठ कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
