मुलींनो सावधान.....!कोल्ड्रिंक्स मधून दारू पाजून दोन अल्पवयीन मुलीवर अकोल्यात सामूहिक अत्याचार तीन तरुण ताब्यात...


 अकोला जिल्हा प्रतिनिधी:-

अकोला शहरात घडलेल्या या घटनेने एकच खळबळजनक खळबळ उडाली आहे. दरम्यान करण्यात आला आहे. अकोला आहे.दिनांक १६ डिसेंबरला दोन अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. काल रात्री या दोन्ही अल्पवयीन मुलींना घरी पोहचायला उशीर झाला,रात्रीचा एक वाजला. घरच्यांनी या दोन्ही मुलींना उशिरा झाल्याबद्दल विचारणा केली असता मुलींनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार आई-वडिलांना सांगितला. दोन्ही मुलींच्या नातेवाईकांनी सिव्हिल लाइन पोलिस ठाणे गाठले.अल्पवयीन मुली आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून घराकडे निघाल्या होत्या. वाटेत त्यांना एक ओळखीचाच युवक भेटला. तो म्हणाला चला 'मी' तुम्हा दोघीला घरी सोडून देतो. असे म्हणून त्याने गाडीवर बसून दोघींनाही सिव्हिल पोलीस स्टेशन हद्दीतील असलेल्या पवन वाटिकेत नेले, त्यानंतर इथे त्याने चॉकलेट आणि थम्सअप म्हणजेच कोल्ड्रिंक प्यायला दिले. यावेळी त्या दोघींनी कोल्ड्रिंक्स आणि चॉकलेट खाल्लं. कोल्ड्रिंक्स प्यायल्यानंतर त्यांना गुंगी यायला लागली तो युवक त्या दोघींनाही घेऊन टेरेसवर गेला, अन त्यांच्यावर  जबरी संभोग केला. त्यावेळी त्याचा मित्रही तिथे दाखल झाला आणि त्यानेही त्या दोघींवर अत्याचार केले. या संपूर्ण अत्याचाराच्याकांडात चार जणांचा सहभाग असल्याची माहिती मिळत आहे. तर, यातील दोघांनी दोन्ही अल्पवयीन मुलीवर अच्यावर केला, तर अन्य दोघांनी त्यांना याबाबत सहकार्य केले. पीडित मुलींपैकी एक मुलगी १४ वर्षांची आणि एक १७ वर्षाची आहे.या अत्याचाराबाबत सध्या पोलिसांनी तीन तरुणांना ताब्यात घेतले असून ऋषिकेश, करण आणि रोहित अशी तिघांची नावे आहेत. तरी अद्याप अत्याचार करणाऱ्या तरुणांची मूळ नावे कळू शकली नाहीत. यातील आरोपी ऋषिकेशने या दोन्ही मुलींना आपल्या दुचाकी गाडीवर बसवून पवन वाटिकेत घेवून गेला. त्यानंतर इथे कोल्ड्रिंक्समध्ये ऋषिकेशने दारू देऊन दोन्ही मुलीवर अत्याचार केला आहे. यासोबतच त्याच्या साथीदारांनी सुध्दा या मुलींवर अत्याचार केल्याचे समजते. पीडित दोन्ही अल्पवयीन मुलींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री कोल्ड्रिंक्स पीत असताना त्यामध्ये कडूपणा जाणवला. त्यामुळे त्यात दारू असावी असा संशय दोन्ही मुलींनी व्यक्त केला आहे. कोल्ड्रिंक्स प्यायल्यानंतर चक्कर आल्यासारखे दोन्ही मुलींना वाटले म्हणजेच गुंगी आली. त्यानंतर दोन तरुणांनी आमच्यावर जबरी अत्याचार केल्याचे म्हटले आहे. तसेच यावेळी त्याचे अन्य मित्रही इथे उपस्थित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, अत्याचार करणाऱ्या तरुणांनी दोन्ही मुलींना कोल्ड्रिामध्ये दारू दिली की अथवा दुसरे काही याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. दोन्ही अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणारे तीन युवक पोलिसांनी अटक केले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अकोला सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस स्टेशन सिविल लाईन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे...

Previous Post Next Post