हिवाळी अधिवेशनात नगरपंचायत स्थगिती हटविण्याची मागणी...आमदार अमोल मिटकरी यांच्याकडे हिवरखेड ग्रा,प सदस्याची मागणी,


 अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी..

हिवरखेड ग्रामपंचायतचे नगरपंचायत मध्ये रूपांतर होण्यासाठी गावात संघर्ष सुरू आहे. या अगोदर मोठमोठी उपोषणे, आंदोलने करण्यात आली. तर विधिमंडळात आमदार अमोल मिटकरी यांनी अनेकदा नगरपंचायत होण्याचा मुद्दा उचलला व  शासनाच्या वतीने नगरपंचायतची उद्घोषणा सुद्धा करण्यात आली होती. तसेच नगरपंचायत आक्षेप यादीत  गावातून 21 लोकांचा समावेश होता त्यापैकी 10 लोकांनी आक्षेप लेखी स्वरूपात परत घेतले.10 जण कोणत्याही सुनावणीस उपस्थित राहिले नाहीत. फक्त एकच आक्षेप कायम राहिला होता, तो आक्षेप सुद्धा मा. जिल्हाधिकारी यांच्या समितीने  फेटाळला होता.नगरपंचायत प्राथमिक घोषणा झाल्यावरही आकोट मतदारसंघाचे आमदार भारसकळे व राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी हिवरखेड नगरपंचायत वर अन्यायकारक स्थगिती आणली. त्यामुळे हिवरखेड वासीयांमध्ये नाराजीचा सूर पाहण्यास मिळाला. याबाबत सोशल मीडियावर अनेकांनी या नेत्याविषयी नाराजी व्यक्त केली. परंतु गावकरी मात्र गप्प बसले नाही. त्यांचा लढा विकासासाठी सुरूच आहे.हिवरखेड नगरपंचायत करायची त्यासाठी पुन्हा एकत्र येऊन आपला लढा सुरू ठेवून हिवरखेड नगरपंचायत येणाऱ्या अधिवेशनात करूच अशी जिद्द बाळगत हिवरखेडवासी पुन्हा नव्याने पाठपुरावा करीत आहेत. आणि अनेकांनी स्थगिती उठवण्यासाठी विविध स्तरावर मागण्या केल्या. तेल्हारा येथे आमदार अमोल मिटकरी यांचे नुकतेच विविध विषयावर आंदोलन पार पडले. त्यामध्ये हिवरखेड ग्रामपंचायतचे युवा सदस्य कामील अली मिरसाहेब यांनी याच्या  स्वतःच्या पत्राद्वारे  येणाऱ्या अधिवेशनात नगरपंचायतची स्थगिती उठवून हिवरखेड नगरपंचायत व्हावी अशा प्रकारचे निवेदन दिले.

प्रतिक्रिया:-

हिवाळी अधिवेशनात हिवरखेड नगरपंचायतचा मुद्दा नक्कीच रेटून धरणार, ज्यांनी स्थगिती आणली त्यांनी हिवरखेड गावाचा विकास खुंटवण्याचा प्रयत्न केला--- अमोलदादा मिटकरी,

आमदार विधान परिषद 

हिवरखेड नगरपंचायत व्हावी या करिता आम्ही प्रत्येक आंदोलनात सहभागी होऊ. नगरपंचायतवर स्थगिती आणणाऱ्यांचा सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो. यामध्ये माझे पद रिक्त झाले तरीही चालेल. पण हिवरखेडचा विकास होण्यासाठी आम्हाला नगरपंचायत पाहीजे.

कामील अली मिरसाहेब,

ग्रामपंचायत सदस्य हिवरखेड

Previous Post Next Post