कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजना अंतर्गत सुनगांव येथे संत्रा उत्पादक शेतक-यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न...


मंगेश राजणकार/जळगांव जा.प्रतिनिधी...

महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा योजना अंतर्गत सराई महादेव मंदिर सुनगांव येथे संत्रा उत्पादक शेतक-यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.सदरील कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आत्माचे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक सागर राऊत यांनी केले असुन कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथील तज्ञ मार्गदर्शक श्री शशांक दाते यांनी संत्रा पिकाची लागवड, जैविक व रासायनिक खत व्यवस्थापन, संत्रा वरील कीड व रोग व्यवस्थापन, सध्या स्थितीत करावयाच्या उपाययोजना या बाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले व शेतक-यांच्या शंकांचे निरसन केले.कृषी विभागाच्या योजना व नैसर्गिक शेती योजनाबाबत सागर राऊत यांनी मार्गदर्शन केले.प्रशीक्षन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी मित्र मोहनसिंह राजपुत, गोपाल धुळे ,यांनी परिश्रम घेतले असुन सुनगांव येथील बहुतांश शेतकरी यांनी प्रशीक्षनाचा लाभ घेतला.

Previous Post Next Post