दादा लाड तंत्रज्ञान कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी नवसंजीवनी देणार-दादा लाड ....


गणेश भड/उपसंपादकRC24 न्युज...

उमरा ( अटाळी)  :- उमरा भिसे येथे 26/09/23रोजी कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद व केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर ( भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कापूस प्रकल्प अंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या वेळी आय सी. ए.आर. चे सदस्य, तथा दादा लाड तंत्रज्ञान चे जनक,  दादासाहेब लाड हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. या वेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष ,भारतीय किसान संघाचे क्षेत्र संघटन मंत्री कैलाश जी ढोले  हे होते . या वेळी बोलताना दादा लाड यांनी शेतकऱ्यांना  लाड तंत्रज्ञानाची माहिती सांगताना या तंत्राचा उपयोग योग्य रित्या केला गेल्यास  शेतकऱ्याच्या खर्चात बचत होऊन उत्पादनात विक्रमी वाढ होते ,त्याच प्रमाणे हे तंत्रज्ञान कापूस उत्पादक शेतकऱ्यासाठी नवसंजीवनी देणारे तंत्रज्ञान असून जास्तीत जास्त या तंत्राच्या आधारे शेतकऱ्यांनी शेती करून समृध्द व्हावे असे आव्हान सुधा या माध्यमातून केले.  तसेच या तंत्राच्या आधारे शेतकरी कापूस पीक हे 3 बाय 1 फूट या अंतरावर लागवड करू  शकता त्यानंतर  कापूस  पिक हे 30 ते 35  दिवसाचे झाल्यानंतर कापूस पिकाची गळ फांदी व फळ फांदी ओळखून त्यातील गळ फांदी काढल्यास कापूस पिकातील  बोंडाच्या वजनामधे निश्चितपणे वाढ होते. यामुळेच शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीस सुद्धा मदत होते  या संदर्भाचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक त्यांनी सर्व शेतकऱ्यांसमोर करून दाखवले.त्याचप्रमाणे कापूस पिकाचे खत व्यवस्थापन कसे करायचे यांचे सुद्धा सखोल मार्गदर्शन त्यांनी याप्रसंगी उपस्थित शेतकरी बांधवांना केले. यावेळी या व्यासपीठावर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख विकास जाधव सर, उपविभागीय कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे साहेब दादा लाड तंत्रज्ञानाचे जिल्हा समन्वय गणेश देशमुख, बी एस देशमुख तसेच रासी सीड चे राजेंद्र सोनुले साहेब हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे  प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख विकास जाधव सर यांनी केले. या प्रशिक्षण व प्रात्यक्षिक कार्यक्रमादरम्यान खामगाव ,शेगाव व संग्रामपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल गाभणे नोडल अधिकारी ,विशेष कापूस प्रकल्प यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीकृष्ण चौधरी यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतीक नागपुरे. सचिन नावकार ,योगेश पाटील व गावकरी मंडळी यांनी विशेष प्रयत्न केले .या कार्यक्रमाचा समारोप पसायदानाने करण्यात आले.

Previous Post Next Post