वन्य प्राण्यांनी सोयाबीन पीक केले नुकसान..तोंडाशी आलेला घास हिरावल्याने महिला अल्पभूधारक शेतकरी आर्थिक संकटात..।


विश्वास कुटे / वाशिम जिल्हा प्रतिनिधी...

रिसोड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणी बू येथील अल्पभूधारक शेतकरी असलेल्या सौ कासाबाई रामभाऊ चौगुले रा. लोणी बू तालुका रिसोड जिल्हा वाशिम या अल्पभूधारक महिला शेतकऱ्याच्या गट नंबर 270 मधील अडीच एकर क्षेत्रावर सोयाबीन तूर या मिश्र पिकाची लागवड केली सदर अडीच एकर क्षेत्रापैकी जवळपास दोन एकर  क्षेत्रावरील हाता तोंडाशी आलेले परीपक्व अवस्थेत  असलेले सोयाबीन पीक नीलगाय, रोही, जाणे  जनावरे यांनी दिनाक 26 जुन च्या रात्री या महिला शेतकऱ्याचे जवळपास एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे .दुसऱ्या दिवशी सकाळी सदर महिला शेतकरी आपल्या शेतात गेल्या असता त्यांना आपल्या शेतातील हाता तोंडाशी आलेले सोयाबीन पीक पूर्णतः नाहीसे केल्याचे पाहताच अश्रूंचा बांध फुटला. पेरणीपूर्व मशागती पासून हजारो रुपये इकडून  तिकडून उसनवारीने, व्याजाने घेऊन खर्च केला जिरायती शेती असल्याने त्यांची पूर्ण भिस्त ही मुख्य खरीप पीक असलेल्या सोयाबीन पिकावर होती. आणि तेच नष्ट झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे पूर्णतः खचून गेलेल्या महिला अल्पभूधारक शेतकऱ्याला वन विभागाने तात्काळ पंचनामा करून भरीव अशी आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच शासनाने तात्काळ वन जंगल परिसराला कुंपण करून शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळावे यासाठी ठोस उपाय योजना कराव्यात अशी मागणी परिसरातील शेकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

Previous Post Next Post