वंचित बहुजन आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयात बौध्द समाज दौरा संवाद नियोजन बैठक संपन्न...


 
वंचित बहुजन आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालयात बौध्द समाज दौरा संवाद नियोजन बैठक संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

२९ सप्टेंबर २०२४ पासुन विदर्भात वंचित बहुजन आघाडी च्या वतीने बौध्द समाज दौरा चे आयोजन करण्यात आलेले आहे. ह्या दौ-याचे नेतृत्व अशोकभाऊ सोनोने प्रदेशाध्यक्ष भारीप बमसं हे करीत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ११ आक्टोंबर २०२४ रोजी प्रवेश होणार आहे. त्या दौ-याची माहीती देणे नियोजन करणे व विदर्भात होणा-या दौ-याची सांगता गारडगांव येथे होणार आहे त्या संदर्भात नियोजन करण्यासाठी देवाभाऊ हिवराळे जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी बुलडाणा ह्यांचा दौरा जळगांव जामोद तालुक्यात झाला. या दौ-याचा मार्ग , नियोजन याची माहीती देणे व सांगता संवाद दौ-यात जास्तीत जास्त संखेने हजर रहावे असे आवाहन केले.या बैठकीस जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे,प्रा.सोनेकर सर,जिल्हा समन्वयक ,बाळुभाऊ दामोदर जिल्हा उपाध्यक्ष , अनील ईखारे महासचीव , डॉ तिडके , संतोष गवई तालुकाध्यक्ष , देवाभाऊ दामोदर ता उपाध्यक्ष , रमेशभाऊ नाईक मा लोकनियुक्त सरपंच , प्रवीण तायडे शहराध्यक्ष , सुरेश वाघोदे ता उपाध्यक्ष,सुनील भटकर ता संघटक ,महादेव बोदडे कार्यालयीन सचिव,राजु शेगोकार, प्रल्दाद जवंजाळ,अँड जितेंद्र सावळे ई कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post