पिंपळगाव काळे येथील पाणीपुरवठा सुरळीत न केल्यामुळे पाणीपुरवठा अधिकाऱ्यांचे तोंडी आश्वासन फेल..पिंपळगाव काळे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा..
मंगल काकडे/ पिंपळगाव काळे...
जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पिंपळगाव काळे ग्रामपंचायत सरपंच शेख हारुण व उपसरपंच दुर्गा मांडोकार तसेच सदस्य सदस्या यांनी प्रादेशिक पाणीपुरवठा जीवन प्राधिकरण जळगाव जामोद तिथल्या अधिकाऱ्यांना वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा पाणीपुरवठा सुरळीत सुरू झालेला नाही तसेच पिंपळगाव काळे येथील १४० गाव योजना पाणीपुरवठा अत्यंत अनियमित व कमी होत आहे. तसेच पाण्याच्या टाकीपर्यंत येणाऱ्या पाण्याचा दाब पण अत्यंत कमी असल्यामुळे पाण्याची टाकी भरण्यास विलंब होत आहे. व पाणीपुरवठ्यामध्ये जवळपास ७ ते ८ तासाचा खंड पडत असल्यामुळे गावातील पाणी पुरवठा जवळपास १२ ते १५ दिवसांवर जात असल्यामुळे गावातील पाणीपुरवठा खूपच अनियमित होत असून गावातील नागरिकांना पाणी वेळेवर न भेटल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. तसेच प्रादेशिक पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जळगाव जामोद येथील अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा कोणत्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे उपोषणाला इशारा देण्यात आलेला होता त्याच अनुषंगाने दिनांक ३०/९/२०२४ रोजी सोमवारला जळगाव जामोद येथील पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर पिंपळगाव काळे सरपंच शेख हारून व उपसरपंच दुर्गा मांडोकार सदस्य सदस्या समस्त गावकरी हे उपोषणात बसले असून त्याच दिवशी पाणीपुरवठा अधिकारी राठोड यांनी उपोषण करते यास भेट घेऊन पिंपळगाव काळे येथील पाणीपुरवठा व पाण्या व्यतिरिक्त समस्या येत्या ५ ते ६ दिवसात दूर करू असे तोंडी आश्वासन देऊन सुद्धा ५ ते ६ दिवस उलटून सुद्धा ग्रामपंचायत पिंपळगाव काळे येथील पाणीपुरवठा सुरळीत झालेला नसून सरपंच उपसरपंच सदस्य सदस्या व समस्त गावकरी मंडळी यांनी परत उपोषणाचा इशारा प्रादेशिक पाणीपुरवठा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जळगाव जामोद यांना दिला आहे.यावेळी, माजी जि.प.अध्यक्ष प्रकाश पाटील, अविनाश उमरकर, संतोष गवई, श्रीकृष्ण गवई, सरपंच शेख हारुण, उपसरपंच दुर्गा मांडोकार, प्रिती तायडे, उषा चोखंडे, सचिन जाधव,अशोक ढोले, नवल गोतरकर, विनोद बहादरे, श्रीकृष्ण वानखडे, मयूर राऊत, रमेश नाईक, रवींद्र जाधव, शालिग्राम भोपळे, सुपडा मानकर, मंगेश मानकर, सुभाष पाटील, किशोर घटे, निलेश निकम, सुनील कळस्कार, सुरेश चोखंडे, गोपाल तायडे, फिरोज खान, इत्यादींची उपस्थिती होती...
