कोल्हटकर महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न...


 
कोल्हटकर महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी- 

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर  महाविद्यालयात दिनांक 2 ऑक्टोबर 24 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. जळगाव शिक्षण मंडळाचे सचिव अनुप पुराणिक,सहसचिव मिलिंद जोशी, प्राचार्य डॉ. गिरीश मायी,पर्यवेक्षक प्रा.जी.एस.वानखेडे, अधिक्षक संजय गाडेकर यांनी  प्रतिमा पूजन माल्यार्पण करुन महापुरुषांना अभिवादन केले.तसेच दिनांक 3 ऑक्टोबर 2024 रोजी महात्मा गांधी, लाल बहादुर शास्त्री, व स्वच्छ भारत या विषयावर वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली, यामधे १४ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ गिरीश मायी, तसेच मिलिंदजी जोशी सहसचिव ज.शि.मं., पर्यवेक्षक प्रा.जी.एस.वानखेडे, अधिक्षक संजय गाडेकर, सांस्कृतिक  विभाग प्रमुख प्रा.राजीव देवकर, यांची प्रमुख उपस्थिती होती.स्पर्धेचे परीक्षण प्रा.विनोद झोपे यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन प्रा.निलिमा भोपळे, व आभार प्रदर्शन कु.मोहिनी खोद्रे या विद्यार्थीनी ने केले.कार्यक्रमांसाठी प्रा.ऋषीकेश कांडलकर, प्रा.वसंत चव्हाण, प्रा.गणेश जोशी प्रा.विनोद बावस्कार, प्रा.रामेश्वर सायखेडे, समाधान निलजे,शिक्षकेतर कर्मचारी बंधु, विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले .

Previous Post Next Post