चिखली आश्रम शाळेतील गंभीर समस्यांना वाचा फोडण्यासाठी विद्यार्थी रस्त्यावर...
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी....
चिखली आश्रम शाळेत विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याने मुख्याध्यापिका कडे समस्या घेऊन गेल्यावर त्या विद्यार्थ्यांशी उद्धट वागतात मुलांना नाहक त्रास देतात.. त्रस्त झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यानी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी चिखली वरून रॅली काढत अकोट फाट्यावर रस्त्यावर उतरून शासनाला जागृत करण्यासाठी चिखली आश्रम वरून हरीसालकडे धारनी परातवाडा रज्यमहामार्गावरील अकोट फाट्यावर शांती मोर्चा काढण्यात आला होता.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत मेळघाट मध्ये आदिवासी आश्रम शाळा चालवल्या जातं आहेत. त्यासाठि मोठ्यप्रमाणात शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येते. तरीही चिखली आश्रम शाळेतील मुलांना पिण्याचे शुध्द पाणी व वापरासाठी पाणी मिळत नाही तसेच आंघोळीसाठी पाणी नाही. एक आठवड्यापासून मुलांनी आंघोळ केली नसल्याचे सांगण्यात येतं आहे. त्यासोबतच इतर सुविधा जेवण नास्ता, दुध वेळेवर व पुरेसा मिळतं नसल्याचा धक्कादायक प्रकार चिखली आश्रम शाळेत उघडकीस आला आहे. मुलांनी शिक्षकांना सर्व प्रकार सांगितलं तरीही शिक्षक व मुख्याध्यापक यांनी गांभीर्याने घेतले नाहीं शेवटी मुलांनी या समस्येला वाचा फोडण्यासाठी एकी करत आश्रम शाळेतून मोर्चा काढत हरिसाल कडे धारणी परतवाडा महामार्गावर निघाले. एवढं सर्व शासनाकडून निधी येतं असताना मुलांना मूलभूत सुविधा आश्रम शाळेत मिळत नसतील तर यापेक्षा मोठ दुर्दैव काय असु शकतो.मेळघाट मध्ये आदिवासी आश्रम शाळेतील मुलावर होणारे अत्याचार हे काही नवीन नाही. मुख्याध्यापक व अधीक्षक यासाठी सर्वस्वी जबाबदार आहेत. बऱ्याच आश्रम शाळेतील मुख्याध्यापक नेहमी गायब असतात. आठवड्यातून एक दिवस शाळेवर येतात त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना काय असुविधा होत आहे याबाबत त्यांना महिती नसते. म्हणून अश्या मुख्याध्यापक व अधिक्षकावर कार्यवाही करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
मुख्याध्यापिका विरुद्ध तक्रार आली आहे. त्यासाठी प्रकल्प कार्यालयातील पथक चौकशी साठी गेले आहे. चौकशीनंतर दोषीवर कार्यवाही करण्यात येईल.
- प्रियंवदा म्हाडदलकर प्रकल्प अधिकारी
