आदिवासी विद्यार्थ्यांना हळदीकुंकवाच्या निमित्ताने ब्लॅंकेट्स वितरण.कस्तुराई बहुउद्देशीय संस्थेचा आगळावेगळा उपक्रम...


 
आदिवासी विद्यार्थ्यांना हळदीकुंकवाच्या निमित्ताने ब्लॅंकेट्स वितरण.कस्तुराई बहुउद्देशीय संस्थेचा आगळावेगळा उपक्रम... 

सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

शेगाव कस्तुराई बहुउद्देशीय संस्थे अंतर्गत आदिवासी आश्रम शाळा शेगाव येथे विद्यार्थ्यांना नायब तहसीलदार माननीय सौ पारखे मॅडम , वैद्यकीय अधिकारी डॉ राठोड मॅडम यांच्या अध्यक्षतेमध्ये, कस्तुराई बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा कालिंदीअसंबे, एसबीआय भजन मंडळाच्या सदस्य अनघा सराफ, आदिवासी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री उगले सर माजी सरपंच तथा समाजसेवक रामहरी जी राऊत यांच्या शुभ हस्ते वितरण करण्यात आले. हिंदू संस्कृतीमध्ये मकर संक्रांतीला दान देण्याची प्रथा आहे आणि तीच प्रथा जोपासून लावण्यायोग वर्गाच्या सर्व योगसाधिकांनी आदिवासी विद्यार्थ्यांना ब्लँकेट देऊन महिलांसमोर मोठा आदर्श निर्माण केला. हळदी कुंकवाचे निमित्य साधून लावण्या योग क्लासच्या सर्व महिलासाधिकांनी संघटन करून हा उपक्रम राबवला. या ब्लॅंकेट्स वितरण मध्ये एसबीआय भजन मंडळ तसेच योगा क्लासच्या सर्व महिलांनी भरभरून आर्थिक मदत देऊन प्रेरणा देणारा उपक्रम राबवला. ब्लॅंकेट्स वितरण नंतर माननीय नायब तहसीलदार पारखे मॅडम यांना सुवासिनी द्वारे ओटी भरून हळदी कुंकू कार्यक्रम सुद्धा संपन्न झाला .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मेधा कुलकर्णी मॅडम तर मुख्याध्यापक उगले सरांनी उत्कृष्ट उपक्रमाबद्दल सर्वांचे आभार मानले.कार्यक्रमाकरिता एसबीआय भजन मंडळ तसेच सर्व महिला योगसाधिका चे सहकार्य लाभले...

Previous Post Next Post