💥काही कळायचे आत विना ड्रायव्हरची बोलेरो पिकप अंगावर आली.. पती-पत्नी जखमी... कारंजा मूर्तिजापुर टी पॉइंट वरील घटना...
अकोला जिल्हा प्रतिनिधी...
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाची कार्य तत्परता काॅल येताच अवघ्या पंधरा मिनटातच रुग्णवाहिकेसह टीम घटनास्थळी दाखल दिनांक 5 जुन 2025 रोजी दुपारी पिंजर नजिक कारंजा मुर्तिजापूर टी पाॅईंटवर कारंजा येथील पती पत्नी रोडवर उभे होते ऐवढ्यातच एक मालवाहु बोलेरो पिकअप अचानक हळु हळु अंगावर येतांना दिसली त्यांना असे वाटले की चालक बाजुला घेईल परंतु गाडी रोडवर उभी होती गाडीत कोणीच नव्हते विना ड्रायव्हर ची गाडी आहे हे अंगावर येई पर्यंत कळायच्या आधीच दोघांनाही धक्का लागला यामुळे पत्नीला रोडच्या साईटवर फेकल्या गेले आणी पतीचा पॅट अडकल्याने थोड पुढे फरपटत गेले सुदैवाने जिवितहानी झाली नाही ही माहीती मिळताच मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन पथकाच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांनी आपले सहकारी मयुर सळेदार,अमीत ठाकूर यांना रुग्णवाहिकेसह घटनास्थळावर रवाना केले लगेच जागेवर प्रथमोपचार करून पिंजर प्राथमिक केंद्रात दाखल केले येथील वैद्यकीय अ.डाॅ.काजल काळे यांनी उपचार करून पुढील अकोला जिल्हा रुग्णालयात रवाना केले आता दोघांचीही प्रकृती चांगली असल्याची माहीती आहे.अशी माहीती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दिली आहे.