हिंदी-मराठी पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी श्रीकृष्ण तायडे...

 


हिंदी-मराठी पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी श्रीकृष्ण तायडे...

बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...

सामाजिक व धार्मिक कार्यात तसेच पत्रकार बांधवांच्या मदतीसाठी सदैव अग्रेसर दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी श्रीकृष्ण निनाजी तायडे यांची हिंदी-मराठी पत्रकार संघाच्या बुलढाणा जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष धनश्रीताई काटीकर पाटील यांनी नियुक्तीपत्र देऊन एका छोटेखानी समारंभात ही नियुक्ती केली. नवनिर्वाचित जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीने शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, श्रीकृष्ण तायडे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. हिंदी मराठी पत्रकार संघाच्या महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यालयात पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच मागील वर्षी दिलेल्या नियुक्ती संपुष्टात आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात नवीन नियुक्त्या करण्याचे एकमताने ठरले. याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्ह्याची जबाबदारी श्रीकृष्ण तायडे यांना सर्वानुमते देण्यात आली. पत्रकार हा आरशासारखा पारदर्शक असतो. त्याला घटनेच्या दोन्ही बाजू दिसत असतात आणि त्यावर तो आपल्या लेखणीच्या माध्यमातून न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असतो. परंतु, पत्रकारिता करताना त्यांना येणाऱ्या अडचणी व समस्यांसाठी हिंदी-मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून नेहमी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण तायडे यांनी दिली. मलकापूर तालुक्यात गेली वीस वर्षे पत्रकारिता करत असलेले श्रीकृष्ण तायडे यांनी विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दलाची विविध पदे भूषवली आहेत.सदर कार्यक्रमात अजय टप यांची विदर्भ संघटक पदावर,  सतीश दांडगे यांची विदर्भ सचिव या पदावर, रवींद्र गणगे सर यांची जिल्हा सचिव पदावर, शेख निसार यांची हिंदी विभाग जिल्हा उपाध्यक्ष पदावर, एन के हिवराळे यांची जिल्हा संघटक पदावर, विनायक तळेकर यांची जिल्हा सहसचिव पदावर, अशोक वानखेडे सर यांची शहर उपाध्यक्ष पदावर, प्रदीप इंगळे यांची तालुका सहसंघटक पदावर नियुक्ती करण्यात आली.यावेळी , प्रा. प्रकाश थाठे सर, मयूर लड्डा, धर्मेश राजपूत, सुधाकर तायडे, डॉ. विजय भगत, सुनील देशमुख, रवी गवाळे, भाऊराव व्यवहारे, बिस्मिल्ला खा. पठाण ,आदी  उपस्थित होते.

Previous Post Next Post