वकाना-निरोड,वकाना भिलखेड रस्त्याच्या मागणीसाठी पॅंथरचे विजय वानखडे यांचे बेमुदत धरणे...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
नागरिकांना दळणवळणाकरिता सोयीस्कर असलेले गावातील रस्ते ज्यामध्ये व वकाना ते निरोड व वकाना ते भिलखेड या रस्त्याचे काम थंड बसत्यात पडले असून दिनांक ६ जून पासून संग्रामपूर तालुक्यातील वकाना गावातील चौकामधील लिंबाच्या झाडावर मचान बांधून ऑल इंडिया पॅंथर सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष भाई विजय वानखडे यांच्या नेतृत्वात रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा या मागणीसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.वकाना ते निरोड व वकाना ते भिलखेड हे दोन्ही रस्ते तालुक्याला जोडणारे असुन गेल्या ५ ते ६ वर्षापासुन रखडलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना तालुक्याला शासकीय कामासाठी व शेतातील पिकवलेला माल घरापर्यंत पोहोचण्यासाठी शेतकऱ्यांना खूप मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्या सर्व शेतकऱ्यांनी रितसर त्या दोन्ही रस्त्याचे दानपत्र सुद्धा दिलेले आहेत परंतु शासन हेतू पुरस्पर राजकीय दबावापोटी हे दोन्ही रस्ते थांबवण्याचे काम केले जात आहे. दोन्ही रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी दि.०३/६/२५ रोजी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद व सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव जामोद यांना निवेदन देण्यात आले होते परंतु अद्याप निवेदनाची कुठलीही दखल न घेतल्यामुळे विजय वानखडे जिल्हा अध्यक्ष ऑल इंडिया पॅंथर सेना वकाना येथील झाडावरती मचान बांधून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.