कुणी रस्ता देता का रस्ता..!येनगाव ग्रामस्थांच्या ग्राम रस्त्याच्या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा..


 
💥कुणी रस्ता देता का रस्ता..!येनगाव ग्रामस्थांच्या ग्राम रस्त्याच्या उपोषणाला वंचित  बहुजन आघाडीचा पाठिंबा..

जळगाव जामोद प्रतिनिधी....

वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने नवनियुक्त तालुका अध्यक्ष माजी लोक नियुक्त सरपंच रमेश नाईक यांच्या नेतृत्वात येनगाव ग्रामस्थांना रस्ता उपोषण करिता पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे.येणगांव ग्रामस्थांचा ग्रामरस्ता हा दळणवळण मार्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.आणि गेल्या २५ वर्षापासून या गावचे ग्रामस्थ या रस्त्या करिता संघर्ष करीत आहेत.दळणवळण मार्गासाठी, विद्यार्थ्यांच्या येण्या जाण्यासाठी,आरोग्यासाठी रस्ता फार महत्त्वाचा असतो त्या अनुषंगाने वंचित बहुजन आघाडी आणि युवा आघाडी ने येनगाव ग्रामस्थांना या रस्त्याच्या मागणीसाठी पाठिंबा दिला. आणि या मागणी साठी आम्ही तुमच्या सदैव सोबत आहों असे आश्वासन सुध्दा तालुका अध्यक्ष रमेश नाईक यांनी दिले.येनगांव वासियांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देते वेळी,तालुका अध्यक्ष रमेश नाईक, ज्येष्ठ नेते तथा तालुका सचिव साहेबराव भगत, तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई,युवा तालुका अध्यक्ष राजरत्न वाकोडे,तालुका उपाध्यक्ष प्रमोद कोकाटे, शहराध्यक्ष प्रवीण तायडे,मीडिया प्रमुख रवी जाधव,जिल्हा सचिव स्वप्निल गवई, ता उपाध्यक्ष अस्मतखान,लोकपाल भगत ,सुनील इंगळे,भास्कर भगत, मॅडी तायडे,भिमराव वाघ ,देवा वानखडे.आदी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपोषण स्थळी उपस्थित होते..

Previous Post Next Post