💥चालठाणा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न...आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते उद्घाटन...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
दिनांक ११ जून रोजी तालुक्यातील चालठाना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर संपन्न झाले या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार डॉक्टर संजय कुटे हे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुनगाव सरपंच रामेश्वर अंबडकार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार कीटे, गट विकास अधिकारी संदीप कुमार मोरे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी शासन आपल्या दारी आले आहे आपल्या समस्या या शिबिरात निकाली काढाव्या असे आवाहन केले. यावेळी विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते, यामध्ये शेतकरी कार्ड तयार करणे, केवायसी करणे, पी एम किसान ,कृषी विभाग ,सेतू विभाग ,विधी व न्याय विभाग, भूमी अभिलेख, आदिवासी विभाग प्रकल्प अकोला, आधार नोंदणी, संजय गांधी योजना निवडणूक विभाग इत्यादी विभागाचे स्टॉल होते. यावेळी आरोग्य विभागाचे डॉक्टर येनकर व डॉक्टर वाघ यांच्या टीमने आरोग्य शिबिर घेतले. सर्वप्रथम बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली व उपस्थितांच्या वतीने चालठाणा खुर्द येथील खातेदारांना मोफत डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा वितरित करण्यात आला यावेळी जिवंत सातबारा अंतर्गत सातबारा देण्यात आला. यावेळी मंडल अधिकारी व्ही एस शिंदे, कृषी पर्यवेक्षक दंदाले,सचिव जोशी, कृषी सहायक शेगोकार, गव्हाणे, मुख्याध्यापक व्यवहारे,तरुणाई फाउंडेशनचे मनजीतसिंह, यांचेसह विविध पक्षांचे पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सर्व सेतू चालक यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनगाव तलाठी गौतम वाघ यांनी केले तर आभार प्रदर्शन मुळे मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषीमित्र मोहनसिंग राजपूत व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले..