ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जळगाव जामोद बाजार समितीचा स्तुत्य उपक्रम; अभ्यासिकेचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते उद्घाटन....


 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जळगाव जामोद बाजार समितीचा स्तुत्य उपक्रम; अभ्यासिकेचे डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते उद्घाटन....

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुला-मुलींना स्पर्धा परीक्षा व उच्च शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळावे, या उद्देशाने जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पिंपळगाव काळे येथे'शेतकरी शेतमजूर कन्यापुत्र अभ्यासिके'  चे भव्य उद्घाटन आज माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. ​बाजार समितीचे संचालक विश्वासराव भालेराव यांच्या संकल्पनेतून आणि सभापती प्रसेनजित दादा पाटील यांच्या विशेष पुढाकारातून ही अभ्यासिका साकारण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राजेंद्र शिंगणे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार रेखाताई खेडेकर, बाजार समितीचे सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजितदादा पाटील, नरेशभाऊ शेळके, भास्करराव काळे,शेतकरी शेतमजूर कन्यापुत्र अभ्यासिकेचे संस्थापक अध्यक्ष राजेशजी गावंडे,तात्या कृपाळ, रफिक शेठ, दत्ताभाऊ पाटील, प्रकाश पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ​कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. बाजार समितीचे संचालक विश्वासराव भालेराव यांनी आपल्या प्रास्ताविकात अभ्यासिका निर्मितीमागची भूमिका विशद केली. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आरती सपकाळ हिने आपले मनोगत व्यक्त करताना या सुविधेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.यावेळी बोलताना माजी आमदार रेखाताई खेडेकर आणि सभापती प्रसेनजित दादा पाटील यांनी बाजार समितीच्या सामाजिक बांधीलकीचे कौतुक केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले की, "शेतकऱ्यांच्या मुलांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता उच्च शिक्षण घेऊन प्रशासकीय सेवेत जावे, यासाठी ही अभ्यासिका मैलाचा दगड ठरेल."या सोहळ्याला बाजार समितीचे संचालक दत्ताभाऊ पाटील, प्रकाश पाटील, रंगराव बाप्पु देशमुख, मनोहर वाघ, भास्कर राऊत, प्रभात खोद्रे, देविदास पारस्कार, विश्वासराव भालेराव, माणिक वाघ, उल्हास माहोदे, मनोज राठी, महादेव भाळतडक, शैलेश दैय्या, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रमोदभाऊ सपकाळ, शालिग्राम रोठे,आशिष वायझोडे,कैलास मानकर, संतोष जवरे, राजु पाटील अवचार,गोपाल घुळे, अकील शहा, राम पारस्कार, महादेव तायडे, यांच्यासह गावातील नागरिक, विद्यार्थी व बाजार समितीचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंता सरदार यांनी केले तर उपस्थितांचे आभार दत्ता डिवरे यांनी मानले. या उपक्रमामुळे पिंपळगाव काळे व परिसरातील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Previous Post Next Post