वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा.वंचित बहुजन आघाडीची मागणी...


 वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा.वंचित बहुजन आघाडीची मागणी... 

जळगांव जामोद(प्रतिनिधी):

जळगांव जामोद तालुक्यात दिनांक 30 मार्च 2026 रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने अनेक शेतकरी बांधवाच्या शेतपिकाचे अतोनात नुकसान झाले या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे पंचनामे तात्काळ करून त्यांना भरिव आर्थिक मदत मिळण्यासाठी आज दिनांक 1एप्रिल 2026 रोजी वंचित बहुजन आघाडी जळगांव जामोद च्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात गहु हरभरा, ज्वारी,मका, संत्रा,केळी व इतर पिकाचे ऐनवेळी हाताशी आलेले पिक अवकाळी पावसामुळे व वादळी वाऱ्यामुळे नेस्तनाबूत झाले यामुळे शेतकरीत हवालदिल झाला आहे यांचे पंचनामे तात्काळ करून त्यांना भरिव मदत मिळावी तसेच घरगुती गॅस टंचाईमुळे गॅसधारकांच्या एजन्सी समोर रंगाच्या रांगा लागल्या आहेत आणि या रांगेमध्ये उभे राहत असताना अनेक नागरिकांना उन्हामुळे चक्कर येणे सारखे प्रकार निदर्शनात येत असल्यामुळे या रांगेमध्ये उभे राहत असलेल्या नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून एजन्सी समोर सावलीसाठी मंडप टाकून त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे तसेच संडास बाथरुम ची सुद्धा व्यवस्था  करण्यात यावी अशी चर्चा मा.तहसिलदार यांचे सोबत करून श्री पवन पाटील तहसिलदार यांनी लगेचच पुरवठा विभागातील अधिकारी यांचे सोबत चर्चा करून त्यांना संबंधित एजन्सी धारकांना प्रत्यक्ष जाऊन सूचना देण्याचे अधिक दिले आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांपैकि कोणीही वंचित राहणार नाही हि दक्षता घेतली जाईल असे आश्वासन दिले यावेळी वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर, तालुका महासचिव सुनिलभाऊ बोदडे, बौद्ध महासभेचे अध्यक्ष जगदिश हातेकर, अताऊल्ला खान, प्रशांत अवसरमोल उपसभापती, निलेश वानखेडे,साहेबराव जाधव, पत्रकार उत्तमराव वानखडे, प्रमोद कोकाटे,युवा कार्यकर्ते सोहेल खान, सरपंच रविभाऊ जाधव, संतोष तिजारे,सुनिल तायडे,रोशन तायडे,अक्षय वाकोडे, संतोष भारसाकळे,श्रिराम भिडे,सुदाम गवई, देविदास वानखडे,अमोल तायडे, लोकपाल भगत, गुलाबराव आठवले, सुनिल इंगळे, समाधान इंगळे, प्रदिप तायडे,वसंता भगत सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post Next Post