तहसील प्रशासन ग्राहक पंचायतच्या वतीने ग्राहक दिन साजरा...जळगाव जामोद तहसील मध्ये ग्राहक मेळाव्याचे आयोजन..


 तहसील प्रशासन ग्राहक पंचायतच्या वतीने ग्राहक दिन साजरा...जळगाव जामोद तहसील मध्ये ग्राहक मेळाव्याचे आयोजन..

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

जळगाव जामोद तहसील पुरवठा विभाग व ग्राहक पंचायत जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने 30 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला... जागतिक ग्राहक दिनाचे औचित्य साधून विविध व्यापारी, स्वस्त धान्य दुकानदार, शेतकरी, विविध शासकीय प्रशासकीय कर्मचारी, ग्राहक वर्ग व असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत ग्राहक मेळावा व चर्चासत्र घेण्यात आले.... सदर  कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नायब तहसीलदार वसंतराव पारस्कर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ग्राहक पंचायत जळगाव जामोदचे अध्यक्ष डॉक्टर सतीश नेवे, प्रमुख मार्गदर्शक एडवोकेट मारोडे,नगरसंघ चालक मिलिंद जोशी व पुरवठा विभाग प्रमुख सुधीर गायकवाड मंचावर उपस्थित होते...सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष पारसकर यांचे स्वागत स्वस्त धान्य दुकानदार किशोर दाताळकर यांचे हस्ते करण्यात आले.... त्यानंतर मार्गदर्शक एडवोकेट  मारोडे यांनी ग्राहक पंचायत ची संकल्पना प्रस्तावना व जागतिक ग्राहक दिनाबद्दल उपस्थिताना सविस्तर मार्गदर्शन केले...यावेळी अनिताताई जैस्वाल, मीनाताई डिडोळकर,मधुस्मिता जोशी, परेश भन्साली,हेमंत जैन शरद डोंगरे, प्रदीप बोबडे, आकाश ओवाळे,जितेंद्र जयस्वाल, विक्रम भन्साली, संजय अग्रवाल यांची विशेष उपस्थिती होती..

Previous Post Next Post