सरोजदेवी किसनलालजी केला सहकार विद्या मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन व जागतिक संगीत दिन उत्साहात साजरा...


 सरोजदेवी किसनलालजी केला सहकार विद्या मंदिरात आंतरराष्ट्रीय योग दिन व जागतिक संगीत दिन उत्साहात साजरा...

जळगाव जामोद(प्रतिनिधी): 

योग हा शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारा जीवनमार्ग आहे आणि संगीत ही आत्म्याची भाषा असून ते मनाला शांतता, आनंद व प्रेरणा देते आणि मानसिक स्वास्थ्य राखते असे प्रतिपादन अध्यक्षीय भाषणातून डॉ सौ. स्वाती केला यांनी केले. त्यासोबतच नियमित व्यायाम व योगाचे मानवी जीवनातील महत्त्व विशद केले. तसेच संगीताचे मानसिक आरोग्य, आनंदी जीवन आणि व्यक्तिमत्त्व विकासातील योगदान अधोरेखित केले. प्रत्येकाने रोज योगासन व प्राणायामाचा अभ्यास करणे आवश्यक आहे हे ही आवर्जून सांगितले. त्याचप्रमाणे २१ जून हा वर्षातील सर्वात मोठ्या दिवसाचे महत्व सांगितले. तसेच ह्यावर्षी २१ जून ला आलेल्या पितृदिन - Fathers Day चा ही आवर्जून उल्लेख करतांना पितृदिन किंवा योगदिन केवळ एकच दिवस साजरा करायचा नसतो तर तो रोजच अंगीकारणे जरुरी आहे. असेही प्रतिपादन केले.सरोज देवी किसनलालजी केला सहकार विद्या मंदिर, जळगाव जामोद येथे आंतरराष्ट्रीय योग दिन व जागतिक संगीत दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्य संयोजिका आदरणीय डॉ. सौ. स्वाती केला मॅडम लाभल्या होत्या.यावेळी शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे सर, कनिष्ठ महाविद्यालय चे विनोद ईश्वरे सर, सहकार विद्या मंदिर वरवट बकालचे प्राचार्य  राजेशजी लोहिया सर यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली. प्रास्ताविक स्वाती वैष्णव मॅडम यांनी केले. त्यानंतर शाळेच्या शिक्षिका दामधर मॅडम यांनी विविध योगासनां चे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जामोद, वरवट बकाल, दानापूर व पिंपळगाव काळे येथील उपस्थित शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे योगाभ्यासात सहभाग घेतला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी बैरागी मॅडम यांनी केले. योग व संगीत यांचा सुंदर संगम अनुभवत उपस्थितांनी निरोगी आणि आनंदी जीवनाचा संदेश आत्मसात केला. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

Previous Post Next Post