शेतकऱ्यांचे तांत्रिक कारणामुळे अटकलेले पिएम किसान व सीएम किसान योजनेचे पैसे जमा करा- अक्षय पाटील...


 शेतकऱ्यांचे तांत्रिक कारणामुळे अटकलेले पिएम किसान व सीएम किसान योजनेचे पैसे जमा करा- अक्षय पाटील...

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

केंद्र सरकारने चालु केलेली पिएम किसान योजना व राज्य सरकारने चालु केलेली सीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे पैसे जळगाव जामोद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक कारणामुळे मिळत नसल्याने शेतकरी खुप हैरान झालेल्या चे दिसत आहे.सदर योजनांचे पैसे जमा व्हावे यासाठी शेतकरी अनेक वेळेस कृषी विभागाच्या कार्यालयाच्या चकरा मारतात परंतु या विभागातील संबंधित अधिकारी नेहमी साठी तांत्रिक अडचणी दाखवत उडवा-उडवीचे उत्तरे देत असल्याने ही बाब शेतकऱ्यांनी युवा आंदोलक अक्षय पाटील यांना सांगितली असता आज दिनांक 22 जून रोजी अक्षय पाटील यांनी सहकाऱ्यांसह तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठून संबंधित अधिकाऱ्यांची सविस्तर चर्चा केली व ज्या शेतकऱ्यांना तांत्रिक अडचण येत आहे अशा शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करुन शेतकऱ्यांना सहकार्य करावे असे सांगितले.जर संबंधित शेतकऱ्यांचे पैसे जमा झाले नाही तसेच त्या शेतकऱ्यांना विनाकारण त्रास देल्यास आपल्या कार्यालयामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आला.यादरम्यान अनिलसिंह राजपूत,शिवदास खिरोडकार,अजय गिरी,वैभव जाणे,अमोल बहादरे,सदाशिव जाणे,सोपान पाटील,संतोष गणगे,नवलसिंग पावरा,राजेंद्र राखुंडे,गणेश जाणे,पुरुषोत्तम अढाव तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सोबत होते.

Previous Post Next Post