सरोजदेवी किसनलालजी केला सहकार विद्या मंदिर, जळगाव जामोद येथे आषाढी एकादशी सोहळा विठुनामाच्या गजरात उत्साहात साजरा..!
जळगाव जामोद (प्रतिनिधी);
सरोजदेवी किसनलालजी केला, सहकार विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, जळगाव जामोद येथे टाळ मृदंगाच्या गजराने संपूर्ण शाळा भक्तीमय वातावरणात दुमदुमली. यानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची सुंदर वेशभूषा साकारणारे विद्यार्थी मिताली पाटील आणि नित्या राठी यांनी सर्वांचे लक्ष वेधले. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले शाळेचे संस्थापक काकाजी आणि अध्यक्ष म्हणून लाभलेले डॉ.किशोर केला, डॉ. स्वाती केला , सुपोजिनिंचे चीफ अकाउंटंट पुरुषोत्तमजी राठी तसेच सत्कारमूर्ती पूनम भगत व तिचे पालक हरि भगत व शुभांगी भगत , शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे सर, विनोद ईश्वरे सर, राजेशजी लोहिया सर, पर्यवेक्षिका अरुणा व्यवहारे, मनीषा म्हसाळ यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीचे पूजन करण्यात आले.हा कार्यक्रम दुहेरी योगाचा असूनही नीट परीक्षेत 720 पैकी 590 गुण मिळवणारी पुनम हरिभाऊ भगत हिचा गुणगौरव करून आई-वडिलांसह सत्कार करण्यात आला...
पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत इयत्ता पाचवी मधील अनाया पिंजरकर आणि इयत्ता चौथी माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र विद्यार्थी श्रेयश गाठे ,प्रथमेश घुले आणि वरद ठाकरे यांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात डॉ. किशोर केला यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत प्रोत्साहन दिले व विठुरायाचे पंढरपुरातील आगमन हे मातापित्यांची सेवा करणाऱ्या भक्त पुंडलिका मुळेच घडले असे ही प्रतिपादीत करून पालकांच्या सेवेचे महत्व देखील विशद केले. त्याचप्रमाणे डॉ. स्वाती केला यांनी एकादशीचे महत्त्व, वारी म्हणजे काय? हे सांगितले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या कर्तृत्वाची जाणीव करून परिश्राचे महत्व व समता, बंधुता यांचे महत्व अधोरेखित केले.कार्यक्रमाच्या प्रसंगी शिक्षिका वैष्णवी सातव यांनी सुंदर भक्ती गीत सादर केले तर प्रास्ताविक शुभांगी बैरागी यांनी केले. आभार प्रदर्शन उज्वला राऊत यांनी केले आणि सूत्रसंचालनाचा भार दिपाली पाचडे यांनी सांभाळला.
याप्रसंगी आषाढी एकादशीचे महत्त्व सांगणारी सुंदर भाषणे सादर करणारे विद्यार्थी व विद्यार्थिनी धनश्री लंगोटे ,आराध्या खंडारे आणि दक्ष भन्साली व आपल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संतांच्या वेशभूषेमध्ये येऊन विद्यार्थ्यांनी अभंग ,ओव्या सादर केल्या तसेच याप्रसंगी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी नृत्य व इयत्ता सातवी च्या विद्यार्थ्यांनी पावली सादर केली.त्यानंतर दिमाखदार दिंडी हरिनामाच्या गजरात व पालखी सोबत पावली करत निघाली. जागोजागी पालखी चे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. सुंदर रिंगण करून उपस्थितांची मने जिंकली.हा भक्तिमय सोहळा यशस्वी होण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.. सर्व विद्यार्थ्यांना उपवासाचा खाऊ म्हणजेच प्रसाद वाटप करण्यात आला कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली...

