सय्यद शकिल/अकोट प्रतिनिधी...
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या अकोट मोहाळा पोपटखेड रोडची अवस्था ही अत्यंत बिकट झालेली आहे. सदर रोडवर ठिकठिकाणी मोठमोठे गड्डे पडले आहे. विशेष म्हणजे पोपटखेड येथे खदानी आहेत. या रोडवर दिवसभर ओवरलोड गिट्टी मुरूम ट्रस्ट गौणखणीज वाहतूक सुरू असते. या ओव्हरलोड वाहतुकीमुळे नागरिकांच्या जीवितवास पूर्णपणे धोका निर्माण झाला आहे. काही दिवसाआधी याच परिसरात नरनाळा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवाकरिता या रोडवर कोटी रुपये शासनाचा निधी खर्च करण्यात आला आहे. मात्र सदर रोडचे काम हे अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. हा रोड गेल्या सहा महिन्यात जागोजागी ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. याच परिसरात श्री संत गजानन महाराज यांची प्रगट विहीर आहे. शांतीवन अमृत तीर्थ येथे दर गुरुवारी तसेच उत्सवा दरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. तरी प्रशासनाचे या रोड कडे छाप दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. या रोड बद्दल वेळोवेळी संबंधित विभागाकडे नागरिकांनी लेखी तोंडी स्वरूपात तक्रारी केले आहे मात्र त्या तक्रारीची सदर विभागाकडून कुठलीही दखल घेण्यात आली नसल्याचे चित्र आहे. तरी सदर विभागात ताबडतोब दखल घेऊन अकोट मोहाळा पोपटखेड या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
___________________________
नरनाळा महोत्सवाच्या दरम्यान पोपटखेड रोडची दुरुस्ती करण्यात आली होती.पण लगेच पहिल्या पावसाठ्यातच ह्या रोडची अत्यंत दयनीय व्यवस्था झाली आहे.या रोडवरून अत्यंत जडवाहतूक चालते तसेच पोपटखेडरोड मार्गावरून जवळपास २० श्रमेव आदिवासी गावांचा प्रमुख संपर्क आहे.व पोपटखेड रोडवरून अनेक प्रकारचे पेशंट अम्बूलन्सद्वारे आकोटल येत असतात.रस्त्याची परिस्थिती अशी झालेली आहे की याची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे.करिता या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी.विरएकलव्य आपात्कालीन बचाव पथक संस्थापक अध्यक्ष
पाडुरंग प्रकाश तायडे पोपटखेड...
