सय्यद शकिल/अकोट तालुका प्रतिनिधी..
अकोट ते हिवरखेड रोडलगत वडाळी सटवाई ग्रामपंचायत हद्दीत बेकायदेशीरपणे चालणाऱ्या कुटणखान्याच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत ग्रामपंचायत प्रशासनाने धडक कारवाई केली आहे.ग्राम पंचायतने यांना आधी नोटीस बजावली असून सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला होता.अखेर ग्राम पंचायतने दखल घेऊन जेसीबीद्वारे १५ झोपल्या व १ पक्क टिनशेड उध्वस्त करून धडक कारवाई केली आहे.याच परिसरात प्रसिद्ध असलेले सटवाई माता मंदिर,हनुमान मंदिर आहे.या अवैध कुंटणखानामुळे या प्रसिद्ध मंदिराला गालबोट लागत होते.कारवाई दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था राखली जावी यासाठी परिसरात ग्रामीण पोलिस निरीक्षक श्रीधर गुट्टे यांचे मार्गदर्शनात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत ग्राम पंचायतने ही कारवाई करण्यात आली आहे.परिसरातील बेकायदेशीर कृत्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहील,असा इशारा प्रशासनाने दिला आहे.यावेळी वडाळी सटवाई ग्राम पंचायतचे सरपंच,उपसरपंच,ग्रामसेवक,पोलिस कर्मचारी उपस्थित होते
