शिवसेना मध्यवर्ती कार्यालय भुसावळ कार्यालयीन प्रतिनिधी वरणगावच्या प्रारुप मतदार याद्यांमध्ये प्रचंड अनागोंदी शिवसेना झाली आक्रमक न्यायालयातही जाण्याचा दिला खणखणीत इशारा वरणगाव नपा वरणगावच्या निवडणूक यांवर हरकती व आक्षेप घेण्याचा आज अखेरचा दिवस होता अखेरच्या दिवशी अक्षरशहा तक्रारी आणि आक्षेपांचा पाऊसच पडला शिवसेनेच्यावतीने नगरपालिकेत शिष्टमंडळ जाऊन धडकले रीतसर लेखी स्वरुपात पुराव्यांचा हरकती आणि तक्रारी दाखल करण्यात आल्या करण्यात आल्या पूर्वी तेराशे 40 हरकती दाखल झालेल्या होत्या आणि आज सुमारे एक हजार च्या आसपास तक्रारी प्राप्त झाल्या या तक्रारींचे निरसन करून याद्या अद्ययावत न केल्यास वेळप्रसंगी औरंगाबाद उच्च न्यायालयामध्ये जाण्याचा खणखणीत इशारा शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख समाधान महाजन व सर्व पदाधिकाऱ्यांनी नगरपालिकेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री सूर्यवंशी साहेब व इतर अधिकाऱ्यांना दिला दिनांक 15/02/ 2019 रोजी नगरपालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप यादीत प्रचंड घोळ असून नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीर नाव समाविष्ट करण्यात आली आहेत मतदार प्रत्यक्षात ज्या ठिकाणी रहिवासाचा आहे तिथे त्याचे नाव नोंदणी अपेक्षित आहे परंतु असे न करता त्यांची नोंदणी इतर प्रभागांमध्ये करण्यात आलेली आहे काही मतदार वरणगाव शहरात राहत नसून देखील बनावट आणि खोट्या कागदपत्रांच्या आधारे राजकीय हेतूने काही नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजकारण्यांनी याद्यांमध्ये प्रचंड घोळ घातलेला आहे या याद्या नियमाप्रमाणे बिनचूक करून लोकशाही मार्गाने निवडणुका पार पाडाव्या अशी अपेक्षा शिवसेनेच्या वतीने व्यक्त करण्यात आली या देशांमधल्या दुरुस्त्या न केल्यास शिवसेना आपल्या पद्धतीने पाठपुरावा करेल हेदेखील पदाधिकाऱ्यांनी निक्षून सांगितले या शिष्टमंडळात रावेर लोकसभा मतदारसंघाचे उपजिल्हा संघटक विलास मुळे उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक उत्तम सुरवाडे तालुकाप्रमुख समाधान महाजन निळू भाऊ सरोदे सुभाष चौधरी सईद मुल्ला सागर वंजारी राहुल बावणे सुरेश चौधरी आदी उपस्थित होते.
वरणगाव नगरपरिषदेच्या पारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड अनागोंदी शिवसेना आक्रमक...
वरणगाव प्रतिनिधी- सुनील पाचपोळ.
