जळगाव जामोद परिसरात मुले चोरून नेणारी टोळी सक्रिय असल्याच्या चर्चांना दिनांक 14 सप्टेंबर रोजी सकाळपासूनच उधान आले होते. यामध्ये कित्येक पालकांनी जळगाव जामोद येथे येऊन आपला मुलगा मुलगी व्यवस्थित आहेत की नाही याची शाळेमध्ये जाऊन चौकशी केली. आणि याच संशयावरून दुपारी तीन ते चार वाजेच्या दरम्यान जळगाव जामोद येथील लहाने बस स्टँड एरियामध्ये एका किन्नरला स्थानिक नागरिकांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काल दिनांक 14 सप्टेंबर रोजी मलकापूर येथील तृतीयपंथी असलेल्या सायरा मोगरा जान वय 20 वर्ष ह्या भिक्षा मागण्याचे काम करतात गावोगावी जाऊन दुकानावर व बाजारात दक्षिणा मागतात दिनांक 14 सप्टेंबर रोजी सायरा मोगरा जान व रेणुका जान हे दक्षिणा मागण्यासाठी जळगाव जामोद ला आल्या त्यानंतर जामोदचा बाजार असल्याने तेथून भिक्षा घेऊन एका अनोळखी ऑटो मध्ये बसून जळगाव जामोद येथील जुने बस स्टँडवर दुपारी 4 च्या सुमारास पोहोचले. त्यानंतर ऑटो चालकाने काही लोकांना फोन करून माझ्या ऑटो मध्ये मुले चोरून नेणारी बाई आहे असे सांगितले त्यानंतर तिथे 7 ते 8 अनोळखी माणसे आली व त्यापैकी 4 ते 5 जणांनी फिर्यादीला ऑटोतून ओढून चापटा बुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली आणि जळगाव जामोद पोलीस स्टेशनला आणले यावेळी ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी मलकापूर येथे चौकशी करून सायरा मोगरा जान ही मोगरा जान यांच्या आश्रमात राहत असून सायरा ही मुले पळवून नेणारी नसून दक्षिणा मागणारी आहे याची खात्री केली दरम्यान सायराला मारहाण करणारे गाजी खान उर्फ बाबर आमिर खान, नवसिंग दुर्गा सिंग सोळंके, प्रवीण उर्फ भुरा भीमराव तायडे, दीपक सुखदेव उंबरकर, अभिजीत विलास तायडे यांच्यावर भांदवी नुसार 323 143 147 149 नुसार जळगाव जामोद पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविला पुढील तपास ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय घोडेस्वार करीत आहेत तसेच यावेळी जळगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी समस्त नागरिकांना असे आवाहन केले की अशा कोणत्याही अफवांना बळी न पडता, संशयित व्यक्ती आपणास जर सापडल्यास त्या व्यक्तीस मारहाण न करता आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन शी संपर्क करून त्या व्यक्तीस पोलिसांच्या ताब्यात देण्यात यावे. जेणेकरून त्या संशयित व्यक्तीची सखोल चौकशी करून सत्यता पडताळून संबंधित घटनेची माहिती समजू शकेल. मुले पकडणाऱ्या टोळी संबंधी पोलीस प्रशासन दक्ष असून कोणीही अफवांना बळी पडू नये असे असे आवाहन आर सी 24 न्यूज बोलताना केले. तसेच यावेळी या अफेमुळे जळगाव जामोद पोलीस स्टेशन परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.
मुले पळवून नेणारी समजून स्थानिकांची किन्नरला जबर मारहाण.. किन्नरच्या तक्रारीवरून जळगाव जामोद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल...
अनिल भगत/बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी...