अश्लील कृत्याने जळगाव हादरले... तब्बल १६ महिन्याच्या चिमुरडीशी अश्लील कृत्य...


 
अश्लील कृत्याने जळगाव हादरले... तब्बल १६ महिन्याच्या चिमुरडीशी अश्लील कृत्य...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

जळगाव जामोद पोलीस स्टेशन हद्दीतील सुनगांव गावात विकृतीलाही लाजवेल अशी घटना घडली आहे.५५ वर्षिय इसमाने तब्बल १६ महिन्याचे लहान चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना दिनांक ५ आँगस्ट च्या सकाळी १०:३० ते ११ च्या दरम्यान घडली असून या घटनेने जळगाव जामोद हादरलं असुन माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना घडल्याने समाजमन सुन्न झाले आहे.१ वर्ष ६ महिन्याच्या चिमुरडीला आंबा खायला देतो म्हणून आरोपी मधुकर पुंजाजी हागे याने चिमुरडीला घरी नेले होते.अर्ध्या तासानंतर चिमुरडी रडत होती त्यामुळे पिडीत चिमुरडीच्या आईने तिला जवळ घेऊन पाहिले त्यावेळी तिच्या शरीरावर रक्ताचे डाग दिसल्याने निरखून पाहिले असता चिमुरडीवर गैरकृत्य झाल्याचे लक्षात आल्यानंतर पिडीत चिमुरडीच्या आईने घरच्यांना सांगितले त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशन गाठले व घडलेल्या घटनेची तक्रार दिल्याने अश्लील कृत्य करणाऱ्या आरोपी मधुकर पुंजाजी हागे यांचे विरोधात अप क्र.३७३/२०२५ कलम ६४(१)६५(२) भारतीय न्याय संहितेनुसार सहकलम ४,८,१२ पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून गावातील वातावरण खराब होऊ नये गावात कायदा व सुव्यवस्था कायम रहावी म्हणून ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी तात्काळ कारवाई करून पोलीस नाईक इरफान शेख व पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंढे यांचे समवेत काही कर्मचाऱ्यांना पाठवुन आरोपी मधुकर पुंजाजी हागे यांस अटक केली आहे.घटनेचा पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ करीत आहेत.

Previous Post Next Post