जिद्द चिकाटीने व ज्ञानाने चालविला हिवरखेडच्या चंदाबाईने संसाराचा गाळा,परमात्माच्या मार्गावर व शासनाच्या लाभावर केला तीन मुलीचा विवाह..


 महिलादिन विशेष ,

हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार,

हिवरखेड चंडिका चौकातील रहिवासी श्रीमती मनोरमा उर्फ चंदाबाई स्व रामराव कंटाळे वय ५३ वर्षे  यांच्या जिद्द चिकाटीच्या जगण्याने इतरांन समोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे, ओंम शांती क्लासच्या माध्यमातून  भरपूर ज्ञान प्राप्त केले, व तेच ज्ञान इतरांना दिले हालाखीच्या परिस्थिती सुद्धा चंदाबाई खचल्या नसून त्यांनी  त्याच्या तीन मुलीचे समाजात लग्न करून मुलीचा प्रपंच व्यवस्थित रित्या पार पडावे या साठी सुद्धा बरेच प्रयत्न केले, विशेष म्हणजे  दोन मुलीचे लग्न झाल्या नंतर  मोठ्या मुलीचा विवाह तिच्या संसारात फारसा टिकू शकला नव्हता तर दुसऱ्या ठिकाणी मद्व्या मुलीच्या विवाहची सुद्धा तीच परिस्थिती होती, एवढं झाल्या नंतर सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी दोन्ही मुलीचे घटस्फोट करून जिद्द  चिकाटी व ज्ञानाच्या जोरावर दोन्ही मुलीचे परत वेगवेगळ्या ठिकाणी चदाबाईने लग्न लावून दिले,  आता तिन्ही मुली आपल्या संसारात आनंदात आहेत,  चंदाबाई ह्या मूळच्या हिवरखेड येथील रहिवासी आहेत त्याचा विवाह १९ ८४ मध्ये  रामराव कंटाळे याच्याशी झाला होता, संसार सुरळीत सुरू असताना चदाबाई यांनी पहिल्या मुलीला जन्म दिला तसेच काही वर्षानंतर त्यांना दुसरी व तिसरी सुद्धा मुलगीच जन्माला आली  नंतर   नसीबाच्या फुटण्याने  चदाबाई याच्या पतीचे १९९२ मध्ये निधन झाले, कुटूंबाची सर्व जबाबदारी एकट्या बाईवर येऊन पडल्याने चदाबाई ह्या आपल्या लहान मुली घेऊन आपल्या माहेरी हिवरखेड येथे आल्या व आपल्या भावंडांच्या छोट्याशा जागेत राहू लागल्या आणि स्वतःचा प्रपंच निर्माण केला, १९ ९५ मध्ये त्यांनी गावातील सदाशिव संस्थान येथिल नर्सरीमध्ये वृक्ष लागवडीकरिता ५ रुपये प्रमाणे झाडांचे संगोपन केले, त्यांनी त्यावेळेसच्या ६० रुपये महिना प्रमाणे निराधार योजनेचा लाभ घेतला,  तसेच  बाहेर मोल मजुरी करणे, घरात मुलींना शिकवुन आपला प्रपंच चालून वेळेत ला वेळ काढून चदाबाईने गावातील ओंम शांती क्लासला वेळ दिला, ओंम शांती क्लास मधून ज्ञान घेणे व आपल्या मुलाबाळांना ज्ञान देऊन त्यांनी इतरांना  ज्ञान देण्याचे काम अजूनही जिवंत ठेवले, त्यांनी गाय ,वासरू, मोल मजुरी, महिला बचत गट, शासनाच्या निर्धार योजनेचा लाभ घेऊन बचत करून आपल्या तिन्ही मुलीचे लग्न लावून  इतरांना ज्ञान देण्याचे मोलाचे सामाजिक कार्य केले त्याच्या या कार्याचे आज जागतिक महिला दिनी कौतुक होत आहे तसेच  पुढे जर चदाबाई यांना शासनाच्या मदतीचे विम्याचे कवच मिळाले तर पुढील काळ त्याचा सुखात जावो. 

प्रतिक्रिया..

मी इतर महिलांना झांशीच्या राणी सारखे जगावे व स्वतःच्या जिद्दीने चिकाटीने, आपल्या ज्ञानाने इतरांना चांगल्या मार्गावर नेण्याचे कार्य करावे हाच संदेश देते,

मनोरमा उर्फ चंदाबाई कंटाळे ,

संघर्षित महिला, हिवरखेड✍️

Previous Post Next Post