वरणगाव शहराच्या बाहेरून चौपदरी महार्गा हा शहराच्या बाहेरून बायपास गेल्या मूळे सध्याच्या महामार्गावरील नागरिकांचे आरोग्य व व्यापाऱ्यांचे अस्तित्व नष्ट होईल यासाठी केंद्रीय मंत्री नितीन जी गडकरी यांनी 70 कोटी मंजूर केले होते मात्र नहि चे अधिकारी यांनी डीपीआर मंजुरी साठी दिल्ली ला पाठविला आहे तरी आपण दिल्ली येथे केंद्रीयमंत्री ना नितीनजी गडकरी यांच्या कडे वरणगाव शहरातील फुलगाव फाटा ते साईबाबा मंदिरापर्यंतच्या समांतर महामार्गाच्या कामाला सुरुवात करा अशी मागणी आज भाजपा च्या वतीने माजी नगराध्यक्ष सुनील काळे भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी सरचिटणीस गोलू राणे नामदेव पेहलवान एकनाथ पेहलवान यांनी निवेदन देउन केली यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी खासदार रक्षाताई खडसे यांच्याशी चर्चा करतांना आपण ह्या समांतर रस्त्यासाठी 70 कोटींचा निधी मंजूर केला आहे त्यात फुलगाव फाटा ते साई बाबा मंदिर दरम्यान रोड रुंदीकरण करून मध्यभागी दुभाजक व लाईट लावण्यात यावे तसेच वरणगाव चौफुल्ली वर सर्कल करण्यात येउन बस स्थानक चौफुल्ली ते तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिर व बस स्थनाक चौफुल्ली ते ऑर्डन्स फयाक्ट्री पर्यंत नवीन रोड समाविष्ट करण्यात यावा आशि मागणी यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्या कडे केली त्यावेळी खासदार खडसे यांनी सांगितले की उद्याच केंद्रीयमंत्री नितिन गडकरी यांच्या कडे दिल्ली येथे अधिवेशनाला जात आहे त्यात ना गडकरी साहेबांना भेटून वरणगाव शहरातील समांतर महार्गाच्या कामाला सुरुवात करण्याचे मी श्री गडकरी साहेबांना सांगते व संबंधीत नही चे अधिकारी यांच्याशी बोलून कामाला सुरुवात करण्याच्या सूचना देते असे खासदार खडसे यावेळी म्हणाल्या.
वरणगाव शहरातील समांतर महामार्गाच्या कामाला सुरुवात करा खासदार रक्षाताई खडसे यांच्याकडे भाजपाची मागणी...
वरणगाव प्रतिनिधी - सुनील पाचपोळ